AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बसमध्ये चढताना धक्का मारीत भांडण काढले, अन् भामटे प्रवाशाचा मोबाईल घेऊन पळाले

राज्य परिवहन महामंडळाच्या कल्याण पश्चिमेतील बस आगारात प्रवाशांजवळील वस्तू चोरणे, आगारात प्रवाशांच्या हातातील वस्तू लुटून नेण्याचे प्रकार घडत होते.  मात्र आता थेट  प्रवाशांनाच मारहाण करुन लुटण्याचा प्रकार बस स्थानकात  घडला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे प्रवाशांनी विशेषत: महिला प्रवाशांनी धसका घेतला आहे. 

बसमध्ये चढताना धक्का मारीत भांडण काढले, अन् भामटे प्रवाशाचा मोबाईल घेऊन पळाले
mahtma phule police stationImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Aug 14, 2024 | 8:59 PM
Share

कल्याण स्टेशन परिसरातील बस स्थानकात धक्कादायक प्रकार घडला आहे. कल्याण पश्चिमेकडील वल्लीपीर रस्त्यावरील वाशी बस स्थानकात बसमध्ये चढताना मुद्दामहून भांडण उकरुन काढून एका त्रिकूटाने प्रवाशाचा महागडा मोबाईल हिसकावून पलायन केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात दिवसेंदिवस भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

कल्याण पश्चिमेकडील वाशी बस थांब्यावर नवी मुंबईमधील एक प्रवासी आणि त्याचे दोन मित्र वाशीबसमध्ये चढत होते. यावेळी तीन भामट्यांनी बसमध्ये चढत असताना हुल्लडबाजी करून एका प्रवाशाबरोबर वाद घालून भांडण उकरुन काढले. तसेच त्याच्याजवळील १२ हजार रूपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून ते पळून गेले. या प्रकरणी कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत.

पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

हेतराज प्रजापती (२२) हे कल्याणमध्ये नोकरी करतात. ते नवी मुंबईतील सानपाडा भागात राहतात. सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान तक्रारदार हेतराज आणि त्यांचे दोन साथीदार वल्लीपीर रस्त्यावरील वाशी बस थांब्यावरील नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या वाशी बसमध्ये चढत होते. बसमध्ये चढत असताना तीन भामट्यांनी हेतराज यांच्याशी बसमध्ये चढताना धक्काबुक्की केली आणि भांडण उकरुन काढले.  हेतराज यांना दमदाटी करून तिन्ही भामट्यांनी त्यांचा  मोबाईल हिसकावला. तो परत देण्याची मागणी हेतराज करू लागले तेव्हा ते तिघे भामटे बसमधून उतरून पळून गेले.  याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. हवालदार पी. एल. साळुंखे तपास करत आहेत.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली