‘तो’ हॉटेलमध्ये शिरला, पत्नीला परपुरुषासोबत एका खोलीत रंगेहाथ पकडलं, त्यानंतर….

'तो' हॉटेलमध्ये शिरला, पत्नीला परपुरुषासोबत एका खोलीत रंगेहाथ पकडलं, त्यानंतर....
करोडपती प्रॉपर्टी डिलरच्या पत्नीचे 13 वर्षांनी लहान रिक्षाचालकासोबत पलायन

एका व्यक्तीने आपल्या पत्नीला हॉटेलच्या एका खोलीत अनोळखी पुरुषासोबत पकडलं. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली. त्यानंतर हॉटेलबाहेर मोठी गर्दी उसळली 9wife caught with unknown person in hotel in West bengal).

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: चेतन पाटील

Jun 03, 2021 | 2:54 PM

कोलकाता : पती-पत्नीच्या नात्यामध्ये विश्वासाचा धागा पक्का असणं जास्त आवश्यक असतं. याशिवाय एकमेकांवर निस्सिम प्रेम आणि जबाबदारीची जाणीव असणं जरुरीचं असतं. तसेच एकमेकांप्रती आदरही असायला हवा. मात्र, काही माणसं या नात्याला काळीमा फासणारं कृत्य करतात. नको असलेल्या किळसवाण्या गोष्टी करुन सामाजिक संतुलण बिघडवण्याचा प्रयत्न करतात. असाच काहीसा प्रकार पश्चिम बंगालच्या अलीपूरद्वार शहरात समोर आला आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीला हॉटेलच्या एका खोलीत अनोळखी पुरुषासोबत पकडलं. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली. त्यानंतर हॉटेलबाहेर मोठी गर्दी उसळली 9wife caught with unknown person in hotel in West bengal).

संबंधित घटना ही बुधवारी (7 जून) अलिपूरद्वार चौपाटीजवळ असलेल्या एलीट हॉटेलमध्ये घडली. एका व्यक्तीने आपल्या पत्नीला हॉटेलमध्ये परपुरुषासोबत बघितलं. याबाबत त्याने आपल्या मित्रांना फोन करुन माहिती दिली. त्यानंतर हॉटेलबाहेर एकच गर्दी उसळली. अनेकांनी हॉटेल बंद करण्याची मागणी केली. कारण त्या हॉटेलमध्ये दुष्कृत्य सुरु असल्याचा दावा तेथील स्थानिकांनी केला. हॉटेलबाहेर गर्दी उसळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी वेळेचा विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी हॉटेल मालिक राजदीष घोष, मॅनेजर विपूल कर आणि आणखी एका कर्मचाऱ्याला अटक केली.

आरोपी महिलेने पोलिसांना काय सांगितलं?

पोलिसांनी आरोपी महिलेला पकडल्यानंतर तिने पोलिसात आपल्या पतीविरोधात जबाब दिला. “माझ्या पतीनेच मला हॉटलमध्ये जायला सांगितलं होतं. तसेच एका अनोळखी व्यक्तीला माझ्या खोलीत पाठवून आक्षेपार्ह फोटो काढण्याचा सल्ला दिला होता. तसेच पतीने त्या व्यक्तीला ब्लॅकमेल करुन पैसे हिसकावण्याचा दम दिला होता”, असा दावा महिलेने केला.

दुसरीकडे पतीने देखील आपल्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. त्याने पोलिसांनी दिलेल्या माहितीत या विषयावरुन आमच्यात सतत वाद सुरु होता, असा दावा त्याने केला (wife caught with unknown person in hotel in West bengal).

पतीने पोलिसांना नेमकं काय सांगितलं?

“माझी पत्नी आज सकाळी जेव्हा घरातून बाहेर निघाली तेव्हा मी तिचा पाठलाग केला. त्यानंतर मी तिला एका हॉटेलमध्ये जाताना बघितलं. त्यानंतर मी माझ्या मित्रांना फोन करुन संबंधित हॉटेलबाहेर येण्यास सांगितलं. त्यानंतर ते हॉटेलबाहेर दाखल झाले. मी हॉटेलमध्ये प्रवेश केला. यावेळी एका खोलीत मला माझ्या पत्नीचा आवाज ऐकू आला. त्यानंतर मी पत्नीला खोलीबाहेर येण्यास सांगितलं. पत्नी खोलीबाहेर आली पण तिच्यासोबत जो व्यक्ती खोलीत होता तो हॉटेलच्या मॅनेजरच्या मदतीने पळून जाण्यात यशस्वी ठरला”, अशी माहिती पतीने पोलिसांना दिली.

हेही वाचा : डॉ. बाबर खरंच डॉक्टर आहेत का? वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्रीचा संताप, राजेश टोपेंनाही सवाल

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें