बायको गावी जायला तयार होईना, पतीकडून सपासप वार, डोंबिवलीतून हादरवणारी बातमी

रात्रीच्या ट्रेनचे तिकीट असतानाही वारंवार सांगूनही पत्नी मनिषा गावी जाण्यास तयार नव्हती. या रागातून पती शिवकुमार यादवने पत्नीची गळा चिरुन हत्या केली.

बायको गावी जायला तयार होईना, पतीकडून सपासप वार, डोंबिवलीतून हादरवणारी बातमी
Husband Murder Wife
| Updated on: Jan 29, 2021 | 2:43 PM

कल्याण-डोंबिवली : पत्नीने गावी जाण्यास नकार दिला म्हणून चवताळलेल्या पतीने पत्नीची (Husband Murder Wife) हत्या केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली. या निर्दयी पतीने पत्नीच्या गळ्यावर सपासप वार करुन पत्नीची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे (Husband Murder Wife).

रात्रीच्या ट्रेनचे तिकीट असतानाही वारंवार सांगूनही पत्नी मनिषा गावी जाण्यास तयार नव्हती. या रागातून पती शिवकुमार यादवने पत्नीची गळा चिरुन हत्या केली.

नेमकं काय घडलं?

शिवकुमार यादव हा पत्नी मनिषा आणि दोन मुलांसह डोंबिवली पूर्वेतील शेलारनाका परिसरात मोहन चाळीत राहत होता. त्यांना एक 18 वर्षाचा तर दुसरा 11 वर्षाचा मुलगा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवकुमार पत्नीसोबत गावी जाणार होता. आज (29 जानेवारी) सकाळपासून त्याची तयारी सुरु होती. मोठा मुलगा कामाला गेला होता.

सकाळी 10 ते 11 च्या सुमारास या पती-पत्नी मध्ये जोरदार वाद झाला. लहान मुलगा त्यावेळी घरातच होता. पत्नी मनिषा ही गावी जाण्यासाठी नकार देत होती. याचा राग आल्याने शिवकुमार याने घरातील चालू घेऊन पत्नी मनिषाच्या गळ्यावर सपासप वार केले. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

हे सर्व घडत असताना त्यांचा लहान मुलगा घरातच होता. समोर घडत असलेला प्रकार पाहून तो घाबरला. त्याला समजत नव्हते की काय करु. तेवढ्यात कोणीतरी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. काहीच वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचले. यावेळी टिळक नगर पोलिसांनी शिवकुमार याला रंगेहात अटक केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Husband Murder Wife

संबंधित बातम्या :

सांगलीत हॉटेलमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, पोलीस निरीक्षकालाच बेड्या, दोघींची सुटका

22000 हजार कोटींचा घोटाळा, सुप्रसिद्ध ओमकार ग्रुपच्या अध्यक्ष आणि संचालकांना ईडीकडून अटक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला 10 वर्षांचा कारावास