AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला 10 वर्षांचा कारावास

अल्पवयीन मुलीला फूस लावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 10 वर्षांची शिक्षा सुनवण्यात आली आहे. (Sangli Accused sentenced prison)

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला 10 वर्षांचा कारावास
| Updated on: Jan 28, 2021 | 10:41 PM
Share

सांगली : एका अल्पवयीन मुलीला फूस लावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 10 वर्षांची शिक्षा सुनवण्यात आली आहे. कवठेमहांकाळ येथील तरुणास दहा वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अजय शिंदे असे या आरोपीचे नाव आहे. सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. (Sangli sexually abusing girl Accused sentenced 10 years prison)

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले होते. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याची घटना 16 जून 2016 रोजी घडली होती.

याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी अजय शिंदे याला पीडित मुलीसह परभणीतून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये अजय शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी सांगली जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुरू होती.

या प्रकरणी गुरुवारी जिल्हा सत्र न्यायालयाने प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि उपलब्ध पुरावे यांच्याआधारे अजय शिंदे याला दोषी ठरवले आहे. त्याला सश्रम कारावास आणि 25 हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच हा दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश डी.एस.हातरोटे यांनी ही शिक्षा सुनावली आहे. (Sangli sexually abusing girl Accused sentenced 10 years prison)

संबंधित बातम्या : 

डांबून ठेवले, चाकूचा धाक दाखवला; आजोबांची आजीविरोधात पोलिसात धाव

पाचशे रुपयांसाठी नोकरी धोक्‍यात, लाचलूचपत विभागाने रंगेहाथ पकडलं

Follow Us
संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल
Video: प्रदीप पूर्णेकर प्रकरण... संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल, 'जिथे राजकारण दिसतं तिथेच राऊत का जातात?'
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची...
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची भीती, धमक्यांचा दावा...
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा!
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं