AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डांबून ठेवले, चाकूचा धाक दाखवला; आजोबांची आजीविरोधात पोलिसात धाव

य झालं तरी नवरा-बायकोची भांडणं काही थांबत नाहीत असं म्हटलं जातं ते खरंच आहे. (old man has filed a harassment complaint against his wife)

डांबून ठेवले, चाकूचा धाक दाखवला; आजोबांची आजीविरोधात पोलिसात धाव
Husband Attack On Gym Owner
| Updated on: Jan 28, 2021 | 7:58 PM
Share

मुंबई: वय झालं तरी नवरा-बायकोची भांडणं काही थांबत नाहीत असं म्हटलं जातं ते खरंच आहे. एका प्रकरणावरून ते समोर आलं आहे. बायकोने घरात डांबून ठेवलं आणि चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून नवऱ्याने पत्नीविरोधात थेट पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. तक्रार करणाऱ्या व्यक्तीचं वय 78 असून त्याच्या पत्नीचं वय 71 आहे. (old man has filed a harassment complaint against his wife)

तक्रारदार आजोबा हे मलबार हिलला राहताता. त्यांना तीन मुले आहेत. पण एकही मुलगा त्यांच्यासोबत राहत नाही. एक मुलगा नाशिकला, दुसरा कॅनडाला आणि मुलगी दिल्लीत राहते. या आजोबांना पत्नी विरोधात अत्यंत गंभीर तक्रार नोंदवली आहे. सोसायटीतील काही पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने खोट्या कागदपत्रांच्या आधारे पत्नीने आपला फ्लॅट स्वत:च्या नावावर केल्याची तक्रार या आजोबांनी केली आहे.

फ्लॅट हडप करण्याचा डावा

माझा फ्लॅट हडप करण्याचा माझ्या पत्नीचा डाव आहे. मला घरातून काढण्यासाठी पत्नीचा डाव सुरू आहे. त्यामुळे ती माझा सतत छळ करत असते. माझं आता वय झालंय. मी कुठे जाणार? असा सवाल या आजोबांनी तक्रारीत केली आहे. या तक्रारीत आजोबांनी अनेक धक्कादायक गोष्टी नमूद केल्या आहेत.

मोलकरणीसमोर चाकू दाखवला

मी घर सोडून जावं म्हणून माझी पत्नी मला चाकूचा धाक दाखवून धमकावत आहे. मला जीवे मारण्याची धमकी देत आहे. माझ्या मोलकरणीसमोर हा प्रकार घडला. मोलकरणीने चाकू हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला असता ती तिच्या अंगावरही धावून गेली. त्यामुळे मी घाबरून बेडरूममध्ये पळ काढला, असं या आजोबांनी म्हटलं आहे.

बेडरूममध्ये डांबले

मी बेडरूममध्ये लपून बसलो तरी तिने माझा पिच्छा सोडला नाही. तिने बेडरूमच्या दरवाजाला बाहेरून कडी लावली. मी दरवाजा ठोठावला, पण तिने उघडला नाही. मला बेडरूममध्ये डांबून ठेवले. कोणीतरी दरवाजा उघडल्याने अखेर मी बाहेर आलो, अशी व्यथाही त्यांनी या तक्रारीत मांडली आहे. आपल्याला पत्नीपासून संरक्षण मिळावं किंवा तिला पुन्हा असे प्रकार करण्यापासून परावृत्त करण्याची विनंतीही त्यांनी पोलिसांना केली आहे. (old man has filed a harassment complaint against his wife)

संबंधित बातम्या:

धक्कादायक ! 11 वर्षाच्या मुलाकडून वडिलांचा ईमेल आयडी हॅक, 10 कोटींची खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी

दरीत फेकल्यानंतर दोन तास झाडावर अडकले, माळशेज घाटातील थरार, वृद्ध अधिकारी कसाबसा बाहेर

मॉडेलिंगचे अमिष दाखवून 14 वर्षीय मुलगी वेश्या व्यवसायात आणल्याचा आरोप, इव्हेंट मॅनेजरसह 2 कास्टिंग डायरेक्टरला अटक

(old man has filed a harassment complaint against his wife)

मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.