सोनम रघुवंशीमुळे पत्नी इंम्प्रेस; मामासोबत रोमान्स, मग पतीचा असा काढला काटा, काळजाचा होईल थरकाप
Aurangabad Shocking Crime : राजा रघुवंशीच्या हत्येने देश हादरला. पण अशा घटना कमी न होता वाढत असल्याचे दिसून येते. सोनम रघुवंशीमुळे इंम्प्रेस झालेल्या एका तरुणीने दीड महिन्यातच तिच्या पतीची हत्या घडवून आणली. पोलिसांनी असा केला या हत्याकांडाचा पर्दाफाश...

देशात सोनम रघुवंशीने तिचा पती राजा रघुवंशीची मेघालयात नेऊन हत्या घडवून आणली. या घटनेने देश हादरला. असे अनेक प्रकार आता देशभरातून समोर येत आहे. पतीचा काटा काढणार्या पत्नींची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोनमपासून प्रेरणा घेऊन या तरुणीने सुद्धा लग्नाच्या 45 दिवसानंतर पतीची हत्या घडवून आणली. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला, तेव्हा त्यांना सुद्धा धक्का बसला. याप्रकरणात तरुणीला अटक करण्यात आली आहे.
गोळी घालून हत्या
प्रियांशू कुमार सिंह (24 वर्ष) हे 24 जून रोजी नवीनगर रेल्वे स्टेशन येथून घराकडे निघाले होते. रस्त्यात त्यांच्यावर काही जणांनी गोळीबार केला. पोलिसांना सुरुवातीला हा सुपारी किलिंगचा प्रकार वाटत होता. पण नंतर या खूनाचे अनेक पदर उलगडत गेले. या हत्याकांडाची मास्टरमाईंडही त्यांच्या घरातीलच असल्याचे समोर आले. प्रियांशूची नवीन बायको गुंजा सिंह हीच या हत्याकांडाची मास्टरमाईंड निघाली.
मामासोबत 15 वर्षांपासून अवैध संबंध
बिहारमधील औरंगाबाद येथील या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. येथील गुंजाचे तिचा 52 वर्षांचा मामा जीवन सिंह याच्यासोबत 15 वर्षांपासून अवैध संबंध होते. ते दोघे एकमेकांवर प्रेम करत होते. या दोघांच्या या संबंधांची माहिती कुटुंबाला माहिती होती. पण सर्वांच्या दबावामुळे तिने प्रियांशूसोबत लग्न केले. पण तिची मामाची आठवण कमी होईना. ती आणि मामा चोरून भेटले. तेव्हा तिने मोठा कट रचला.
सोनम रघुवंशीच्या प्रकरणानंतर लागलीच निर्णय
देशभरात इंदूर येथील राजा रघुवंशीच्या खून प्रकरणाची चर्चा होती. सोनमने पतीला कसे मेघालयात नेऊन त्याची हत्या केली, ही सर्व माहिती गुंजाने जमा केली. त्यानंतर तिने पतीच्या हत्येचा कट रचला. मामाला तिने ही योजना सांगितली. पतीची हत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचे तिने मामाला पटवले. मग जीवनसिंह याने झारखंड येथील गढवा जिल्ह्यातील जयशंकर चौबे आणि मुकेश शर्मा या गुन्हेगारांना प्रियांशूच्या हत्येची सुपारी दिली.
आणि मग झाली अटक
24 जून रोजी रात्री घरी येताना आपण सध्या कुठे आहोत, याची माहिती प्रियांशूने त्याच्या पत्नीला दिली होती. गुंजाने त्याला फोन केला होता. गुंजाने लागलीच ही गोष्ट मामाला सांगितला. मामाने दोन्ही गुंडांना त्याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन प्रियांशूवर गोळ्या चालवल्या. पोलिसांनी याप्रकरणात कॉल डिटेल्स आणि कॉल रेकॉर्डिंग ऐकल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकरली. त्यांनी गुंजाला अटक केली. तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
