भाच्याच्या प्रेमात मामी झाली वेडी, माणूसकी सोडली, पतीचे हातच तोडले आणि..
Muzaffarpur Maami Bhanja Affair : एका मामी तिच्या भाच्याच्या प्रेमात इतकी वेडी झाली की माणुसकीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. प्रथम तिने तिच्या पतीचे हात तोडले. नंतर तिने मुलाला...

Muzaffarpur News : बिहारमधील मुझफ्फरनगरमधून एका मामी आणि भाच्याची प्रेमकहाणी समोर आली आहे. मामी तर प्रेमात इतकी बुडाली की, सगळी लाज विसरून तिच्या भाच्यासोबत पळून गेली. कारण तिला तिच्या पतीमध्ये काहीही रस नव्हता. मात्र जाण्यापूर्वी तिने जे केलं त्याने सगशलेच हादरले. भाच्यासोबत पळून जाण्यापूर्वी तिच्या पतीवर प्राणघातक शस्त्राने हल्ला केला, त्याचे हात तोडले. इतकंच नाही तर ती तिच्या मुलालाही सोबत घेऊन गेली. मामीच्या या कृत्याने संपूर्ण गाव हादरले आहे. पतीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवून फरार मामी आणि भाच्याचा शोध सुरू केला.
ही घटना बोचाहान पोलीस स्टेशन परिसरातील एका गावातील आहे. येथे राहणाऱ्या नवल किशोर आणि खुशबू देवी या जोडप्याचे आयुष्य आनंदाने चालले होते. पण नंतर भाचा नीरज त्यांच्यात आला. घरी येताच मामी तिच्या भाच्याच्या प्रेमात पडली. तिचा नवरा बाहेर असताना मामी तिचा भाचा, नीरजला घरी बोलावायची. ती त्याच्या प्रेमात इतकी वेडी झाली की तिने तिच्या नवऱ्याला मारहाण केली, त्याचे हात तोडले आणि तिच्या पुतण्यासोबत पळून गेली.
भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी
मिळालेल्या माहितीनुसार, खुशबूचे 20 वर्षांपूर्वी नवल किशोरशी लग्न झाले होते. ज्या भाच्यासोबत ती पळून गेली तो तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. याप्रकरणी पीडित पतीने पोलिसांना अर्ज देऊन या प्रकरणाची चौकशी आणि कारवाईची मागणी केली आहे. त्याने आपल्या पत्नीच्या अत्याचारामुळे पोलिसांकडेही अपील केले आहे. पीडित पतीने पोलिसांना सांगितले की, माझा भाचा, तो गढ़ान पोलीस स्टेशन परिसरात राहतो, तो माझ्या घरी वारंवार येत असे. दरम्यान, तो माझ्या पत्नीच्या प्रेमात पडला आणि मी विरोध केला तेव्हा तो माझ्याशी भांडू लागला. एवढेच नाही तर दोघांनीही मला मारहाणही केली. माझ्या मुलानेही माझ्या पत्नीच्या प्रेमसंबंधाला विरोध केला. समजावून सांगूनही दोघांनीही ऐकले नाही. मग माझी पत्नी माझ्या भाच्यासोबत माझ्या 13 वर्षांच्या मुलाला घेऊन पळून गेली.
जातानाही दिली धमकी
पती म्हणाला- माझी पत्नी, खुशबू देवी ही तिच्या प्रियकरासोबत पळून गेलीच पण जाताना ती 50 हजार रुपये रोख रक्कम, लाखोंचे दागिने आणि जमिनीची कागदपत्रे घेऊन फरार झाली. मला हे कळले, तेव्हा मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण नीरज आणि खुशबूने मला मारहाण केली. माझे हातच तोडले आणि दोघेही फरार झाले. मी जर हे कोणालाही सांगितलं तर ती जीव देईल, अशी धमकीही खुशबूने मला जाताना दिली, असं पीडित पतीने सांगितलं.
याप्रकरणी पोलिसांनी पीडित इसमाला तपास आणि कारवाईचे आश्वासन दिले आहे. एसएचओ राकेश कुमार यादव म्हणाले की, या प्रकरणात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. तपास आणि कारवाई सुरू आहे. लवकरच दोघांचाही शोध घेतला जाईल, असे त्यांनी सांगितलं.
