‘तुला भांडणंच लागतात’, पतीचे बोल जिव्हारी, महिलेने रागात स्वत:ची जीभ कापली

उत्तर प्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका महिलेचं पतीसोबत भांडण झालं. पतीने तिला भांडखोर म्हटलं. तुला भांडणंच लागतात, असं पती तिला भांडणादरम्यान म्हणाला.

'तुला भांडणंच लागतात', पतीचे बोल जिव्हारी, महिलेने रागात स्वत:ची जीभ कापली

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका महिलेचं पतीसोबत भांडण झालं. पतीने तिला भांडखोर म्हटलं. तुला भांडणंच लागतात, असं पती तिला भांडणादरम्यान म्हणाला. हे शब्द पत्नीच्या जिव्हारी लागले. तिने रागात पती विरोधात रोष व्यक्त करण्यासाठी स्वत:ची जीभ ब्लेडने कापली. त्यानंतर घरात मोठा गदारोळ झाला. महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नेमकं प्रकरण काय?

संबंधित घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महिलेने इतका टोकाचा निर्णय घ्यायला नको होता, असं मत परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केलं जातंय. महिलेचं नाव बबली असं आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. संबंधित घटना ही रविवारी (12 सप्टेंबर) दुपारी घडली. पती-पत्नीमध्ये नेमका वाद काय झाला? ते अद्याप समोर आलेलं नाही. पण दोघांची घरची परिस्थिती नाजूक आहे. त्यांना दोन मुलं आहेत. आर्थिक अडचणींमुळे दोघांमध्ये सतत वाद होत असायचा, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संबंधित घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

पुण्यात क्षुल्लक कारणावरुन वाद, पत्नीची थेट आत्महत्या

दुसरीकडे काही दिवसांपूर्वी पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली होती. जगातील प्रत्येक नवरा बायकोमध्ये छोटेमोठे वाद, भांडणं होत असतात. अशा छोट्या-मोठ्या वादातून, रुसव्या-फुगव्यातून नवरा-बायकोचं नातं अधिक दृध होत जातं असं म्हणतात. मात्र क्षुल्लक कारणावरुन पतीसोबत झालेल्या वादातून एका महिलेने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली. संबंधित घटना ही 31 डिसेंबरला समोर आली होती. प्रतिक्षा सरवदे असे मयत महिलेचे नाव असून गहिनीनाथ सरवदे असे पतीचे नाव आहे. याप्रकरणी पतीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

गहिनीनाथ आणि प्रतिक्षा हे जोडपे मूळचे सोलापूरचे रहिवासी आहेत. नोकरीनिमित्त पुण्यात राहत होते. गहिनीनाथ हा उच्च शिक्षित तरुण असून पुण्यात एका मोठ्या कंपनीत कामाला आहे. गहिनीनाथचे लग्न दोन वर्षापूर्वीचं प्रतिक्षासोबत झाले होते. त्या दोघांना एक मुलगा देखील आहे. दोघेही पुण्यात आंबेगाव पठार परिसरात राहत होते. गहिनीनाथने ऑफिसमधून घरी येताना पाणीपुरी पार्सल आणली होती. मात्र यामुळे प्रतिक्षा संतापली. मला न विचारता पाणीपुरी का आणली म्हणून प्रतिक्षा चिडली. यानंतर दोघांमध्ये भांडण झाले आणि प्रतिक्षाने पाणीपुरी खाण्यास नकार दिला.

याच रागातून गहिनीनाथनेही दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला डबा घेऊन जाण्यास नकार दिला. याच रागातून प्रतिक्षाने विष प्राशन केले. यानंतर प्रतिक्षा बेशुद्धावस्थेत घरी पडल्याने शेजाऱ्यांनी तिला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान प्रतिक्षाचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रतिक्षाच्या वजिलांनी गहिनीनाथ विरोधात भारती विद्यापीठ पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गहिनीनाथला अटक केली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

औरंगाबादमध्ये पत्नीसमोर पतीने स्वतःचा गळा चिरला

शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर एका पतीने आपल्या पत्नीसमोरच धक्कादायक कृत्य केलं आहे. पतीने बसस्थानकावर आपली पत्नी समोर उभी असताना स्वत:चा गळा धारदार शस्त्राने चिरून घेतला. ही घटना सोमवारी (30 ऑगस्ट) मध्यरात्री घडली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असनू जखमी पतीला औरंगाबादच्या शासकीय रुग्णलयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार जखमी पतीचे नाव भाऊसाहेब काकडे तर पत्नीचे राणी काकडे असे आहे. काकडे यांची प्रकृती सध्या गंभीर आहे

हेही वाचा :

दहशतवादी जानचे 20 वर्षांपासूनचे दाऊदच्या कंपनीसोबत संबंध, तो आमच्या नजरेत होता : महाराष्ट्र एटीएस

65 वर्षीय नराधमाकडून अवघ्या 12 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, जालना हादरलं, महाराष्ट्रात बलात्काराचे सत्र अजूनही सुरुच

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI