AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सासरी तंत्र-मंत्राच्या पूजेसाठी कपडे उतरवायचे आणि…लग्नात 5 कोटीचा खर्च, महिलेचा धक्कादायक खुलासा

लग्नानंतर सासरी पोहोचलेल्या सूनेला सासूने अर्ध्या रात्री तंत्र-मंत्राच्या पूजेसाठी कपडे उतरवण्यासाठी दबाव टाकला... अशात सासूने असा दावा केला आहे की, कुटुंबाची संपत्ती आणि प्रगती याच पूजेमुळे झाली आहे आणि या पूजेसाठी सर्वांना निर्वस्त्र बसावं लागतं...

सासरी तंत्र-मंत्राच्या पूजेसाठी कपडे उतरवायचे आणि...लग्नात 5 कोटीचा खर्च, महिलेचा धक्कादायक खुलासा
| Updated on: Apr 01, 2026 | 1:58 PM
Share

लग्न करून सासरी गेलेल्या तरुणीसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. जेथे लग्नानंतर पूजेच्या नावाखाली नव्या सूनेला कपडे काढून पूजेला बसण्यास सांगितलं. मिळालेल्या मीहितीनुसार, पीडित महिलेचं लग्न दोन वर्षांपूर्वी झालं होतं. महिलेने केलेल्या आरोपांनुसार, सासऱ्यांनी तिला मारहाण केली… तर यामध्ये पती देखील सामिल आहे… अखेर सततच्या सासरच्या जाचाला कंटाळलेल्या महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली… प्रकरण हाय प्रोफाईल असल्यामुळे अनेकदा दाबण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला… पण आता खबरदारी घेत पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

सासूने मध्यरात्री केली तंत्र – मंत्राची पूजा

पीडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर सासरी पोहोचल्यानंतर, सासूने मध्यरात्री तांत्रिक पूजेत सामिल होण्यासाठी दबाव टाकला… सासूच्या दाव्यानुसार, कुटुंबाच्या संपत्ती आणि प्रगतीसाठी ही पूजा आहे आणि पूजेसाठी निर्वस्त्र बसावं लागेल…

कपडे काढून पूजेला बसण्यासाठी महिलेवर दबाव

महिलेच्या म्हणण्यानुसार, तिने विरोध केला, परंतु तिचा नवरा, सासरे आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी तिचे कपडे जबरदस्तीने काढले. त्यानंतर तिला सासऱ्यांसोबत एका खोलीत कोंडून ठेवण्यात आलं, जिथे तिचा अत्यंत क्रूरपणे छळ करण्यात आला, असं देखील आरोप आहेत की, नंतर तिला कुटुंबासोबत पूजेच्या वेळी नग्न बसण्यास भाग पाडलं गेलं आणि तिने विरोध केल्यावर तिला मारहाण करण्यात आली.

वडिलांनी लग्नात खर्च केले 5 कोटी रुपये

पीडित महिलेच्या वडिलांनी लेकीच्या लग्नासाठी 5 कोटी रुपये खर्च केलेले, असं असताना देखील तिच्या सासरच्या मंडळींनी 2 कोटी रुपये मागितले. शिवाय सोन्याची देखील मागणी केली… अखेर सततच्या मानसिक आणि शारीरिक छळामुळे, ती जानेवारी 2025 मध्ये माहेरी परतली आणि तिने घडलेली घटना आपल्या कुटुंबीयांना सांगितली.

महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सुरुवातील तडजोड करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महिलेने सासरे, सासू, पती, दीर आणि कुटुंबातील अन्ये सदस्यांविरोधात FIR दाखल केली. महिलेने असा देखील आरोप केला आहे की, तिचं स्त्रीधन देखील सासरच्या लोकांकडे आहे… आता याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहे…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासू-सासऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचं घर आणि दुकान बंद आढळलं. जवळच्या लोकांनी सांगितले की, घरातील सदस्य बाहेरगावी गेले आहेत… संबंधित घटना कानपूर, उत्तर प्रदेश येथे घडली आहे.

Follow Us
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
महाज्योती परीक्षा रद्द, आंबेगाव आणि नांदेड केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
Pratap Sarnaik On Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; ठाण्यातील प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?