AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक्स-बॉयफ्रेंडचा बदला घ्यायला गेली, पण घडलं भलतंच…. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा नाहक गेला जीव ! त्या दिवशी नक्की काय झालं ?

एका शुल्लक कॉमेंटवरून सुरू झालेला वाद तरूणाच्या जीवावर बेतला. वादावादीनंतर झालेल्या हल्ल्यात भलताच जखमी झाला.

एक्स-बॉयफ्रेंडचा बदला घ्यायला गेली, पण घडलं भलतंच.... दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा नाहक गेला जीव ! त्या दिवशी नक्की काय झालं  ?
लग्नाचे आमिष दाखत महिलेवर अत्याचार
| Updated on: Jul 27, 2023 | 6:01 PM
Share

इंदूर | 27 जुलै 2023 : कारमधून जाणारी तरूणी आणि तिच्या मित्रांवर केलेल्या कमेंटमुळे काही तरूणांमध्ये वाद झाला आणि तो भलताच महागात पडला. दोघांच्या भांडणात तिसऱ्या व्यक्तीचा नाहक जीव (death) गेला. या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर (crime news) हादरलं.

इंदूर शहरातील विजय नगर चौकात चाकूने भोसकून बीटेकच्या विद्यार्थ्याची हत्या केल्याप्रकरणी एका मुलीसह ३ आरोपींनी नुकतेच आत्मसमर्पण केले. दुसऱ्या व्यक्तीला धडा शिकवायचा होता, पण चुकून तिसऱ्याच तरूणाची हत्या केल्याचे आरोपी तरूणीने पोलिसांच्या चौकशीत कबूल केले. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

खरंतर हे संपूर्ण प्रकरण इंदूरच्या विजय नगर पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. तेथे मोनू उर्फ ​​प्रभास पवार, रचित, विशाल ठाकूर आणि टिटू हे मित्र कारमधून चहा पिण्यासाठी निघाले होते. त्याचवेळी ॲक्टिव्हावर आलेली एक तरूणी व तिच्या साथीदारांनी, कारमध्ये बसलेल्या तरूणावर हल्ला केला. मात्र तो थोडक्यात वाचल्याने त्यांनी मोनू उर्फ प्रभास या दुसऱ्या तरूणावर वार केला. त्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारांसाठी तत्काळ नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले पण तेथे दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली. जिथे ही हत्या झाली तेथील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी तपासले आणि ॲक्टिव्हाच्या नंबर प्लेटच्या आधारे आरोपींची ओळख पटवली. या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी हल्लेखोर तरूणी तानिया हिला अटक करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने स्वत:हूनच पोलीस स्थानक गाठत आत्मसमर्पण केले.

एका कमेंटमुळे झाला वाद

तानिया आणि कारचालक टिटू यांची आधीपासूनच मैत्री होती. हत्येच्या दिवशी टिटू त्याच्या मित्रांसोबत बाहेर पडला होता. तेव्हा त्याला तानिया तिच्या इतर दोन मित्रांसोबत ॲक्टिव्हावर फिरताना दिसली. ते पाहून टिटू व त्याच्या इतर मित्रांनी तानियावर कमेंट केली. यामुळे ती संतापली आणि ती तिच्या मित्रांसह टिटू व इतर तरूणांशी वाद घालू लागली.

त्यांचे भांडण चांगलेच पेटले. अखेर तानियाने टिटू आणि त्याचा मित्र रचित यांच्यावर चाकूने हल्ला केला. मात्र ते दोघेही थोडक्यात बचावले. तेव्हा संतापलेल्या तानियाने टिटूचा दुसरा मित्र मोनू उर्फ प्रभासवर चाकूने हल्ला केला. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आणि उपचारांदरम्यान त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Follow Us
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह