AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तरुणाचा विवाहितेवर जडला जीव, नकार दिल्यामुळे विहिरीत ढकलून केली हत्या

सांगली जिल्ह्यातील देववाडी इथे ही घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

तरुणाचा विवाहितेवर जडला जीव, नकार दिल्यामुळे विहिरीत ढकलून केली हत्या
| Edited By: | Updated on: Jan 22, 2021 | 3:12 PM
Share

सांगली : प्रेम प्रकरणातून अनेक गुन्हे झाल्याच्या घटना आपण पाहिल्या असतील असाच एक धक्कादायक प्रकार सांगलीमध्ये समोर आला आहे. इथे एकतर्फी प्रेमातून विवाहित तरुणीचा विहिरीत ढकलून खून करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील देववाडी इथे ही घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. (young man was killed by being pushed into a well for refusing to marry in sangali)

सांगली जिल्ह्यातील देववाडी इथं एकतर्फी प्रेमातून विवाहित तरुणीचा विहिरीत ढकलून खून करण्यात आला आहे. रुपाली मारुती खोत (वय 32) असे खून झालेल्या महिलेचं नाव आहे. काल सायंकाळपासून महिला बेपत्ता होती. सगळीकडे तिचा शोध घेतला असता कुठेही पत्ता लागला नाही. अखेर आज विहिरीत तिचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तपास सुरू झाला असल्याचंही सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खून करणारा संशयित निवास खोत (वय – 20) हा तरुण घटनेनंतर पसार झाला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ते पुढील तपास करत आहेत. संशयीत निवास खोत हा गावातील महिलेची छेडछाड करत होता. मृत महिलेच्या समोरसुद्धा तो कपडे काढून उभा राहिला होता. पण महिलेने विरोध केला असता तिला विहिरीत ढकलून तिची हत्या केली.

दरम्यान, पोलिसांनी विहिरीतून महिलेचा मृतदेह बाहेर काढला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहे. हत्या केलेला आरोपी अद्याप बाहेर मोकाट फिरत असल्यामुळे गावकऱ्यांमध्येही भीतीचं वातावरण आहे. तर प्रत्येकाने आपली काळजी घ्यावी आणि सतर्क राहावं अशा सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. (young man was killed by being pushed into a well for refusing to marry in sangali)

संबंधित बातम्या – 

मुंबईत पोलीस उपाधीक्षकावर बलात्काराचा गुन्हा, सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या आरोपाने खळबळ

धक्कादायक! 60 वर्षीय महिलेचा अनैतिक संबंधातून खून झाल्यानं खळबळ

पुणे हादरलं! भीमा नदीपात्रात आढळला मृतदेह; डोके, हात-पाय शरीरापासून केले होते वेगळे

(young man was killed by being pushed into a well for refusing to marry in sangali)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.