electric bike : इलेक्ट्रिक बाईक वापरत असाल तर काळजी घ्या; कराडमध्ये बॅटरी चार्जिंगला लावताना लागला शॉक, युवतीचा मृत्यू

| Updated on: May 21, 2022 | 6:24 PM

दरम्यान गाडीतील बॅटरी चार्जिंगला लावत असतानाच त्याचा अचानक शॉक शिवानीला लागला. ज्यात ती गंभीर जखमी झाली होती. नातेवाइकांनी तिला उपचारार्थ रुग्णालयात हलवले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

electric bike : इलेक्ट्रिक बाईक वापरत असाल तर काळजी घ्या; कराडमध्ये बॅटरी चार्जिंगला लावताना लागला शॉक, युवतीचा मृत्यू
बॅटरी चार्जिंग
Image Credit source: tv9
Follow us on

कराड : देशात सातत्यानं वाढणाऱ्या इंधनतेलाच्या (Petrol and diesel) किमती लक्षात घेता नागरिकांनी इलेक्ट्रिक बाईक आपली पसंती दाखवली आहे. काही नागरिक इलेक्ट्रिक बाईक (electric two-wheeler) घेत आहेत. मात्र, इलेक्ट्रिक बाईक चार्जिक करताना काळजी घेतली नाही तर काय होतं याचा प्रत्यय आणून देणारी घटना साताऱ्यात घडली आहे. सातारा जिल्ह्यातील साताऱ्यातील कराड तालुक्यातील म्होप्रे येथे घडली आहे. येथे एक दुर्दैवी घटना समोर आली असून येथे एका युवतीचा इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी चार्जिंगला (battery charging) लावताना शॉक मृत्यू झाला आहे. ही  येथे शुक्रवारी (19 मे) घडली आहे. तर या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या युवतीचे नाव शिवानी अनिल पाटील (वय 23) असे आहे.

इलेक्ट्रिक दुचाकीचा वापर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या पेट्रोल महाग होत असल्याने म्होप्रे येथील शिवानी पाटील ही युवती इलेक्ट्रिक दुचाकीचा वापर करत होती. शुक्रवारी (19 मे) रोजी शिवानी हा बाहेर गावी जाणार असल्याने तिने आपल्या गाडीतील बॅटरीची चार्जिंग तपासली. त्यावेळी चार्जिंग कमी असल्याचे तिच्या निदर्शनास आले. दरम्यान तिने ती चार्जिंग लावण्यासाठी काढली आणि चार्जिंग लावण्यासाठी घरात नेली.

दरम्यान गाडीतील बॅटरी चार्जिंगला लावत असतानाच त्याचा अचानक शॉक शिवानीला लागला. ज्यात ती गंभीर जखमी झाली होती. नातेवाइकांनी तिला उपचारार्थ रुग्णालयात हलवले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच या घटनेची नोंद कराड तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.

हे सुद्धा वाचा

नाशिकमध्ये इलेक्ट्रिक बाईकचा स्फोट झाला होता

याआधीही नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील ऐश्वर्या रेसिडन्सीमध्ये अशीच घटना घडली होती. ज्यात इलेक्ट्रिक बाईक चार्जिंग करताना स्फोट झाला होता. ज्यात चार्जिंग करणारा व्यक्ती थोडक्यात बचावला होता. त्यावेळी इलेक्ट्रिक बाईकमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यानं बाईकचा स्फोट झाला होता. तर त्यानंतर तेथे जाग्यावर केवळ बाईकचा सांगाडा राहिला होता.