AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : रात्रीच्या अंधारात उलट्या पावलांची भूतं, शिर नसलेला मुलगा? तालुक्यात खळबळ, पोलिसांकडून कथित व्हिडीओचा पंचनामा

सोशल मीडियावर नेमकं काय व्हायरल होईल याचा काहीच थांगपत्ता नाही. याशिवाय लोकांना गंडवण्यासाठी किंवा परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी अंधश्रद्धेचा अवलंब करुन अफवा पसरवण्याचा अनेकांचा हेतू असतो.

VIDEO : रात्रीच्या अंधारात उलट्या पावलांची भूतं, शिर नसलेला मुलगा? तालुक्यात खळबळ, पोलिसांकडून कथित व्हिडीओचा पंचनामा
रात्रीच्या अंधारात उलट्या पावलांची भूतं, शिर नसलेला मुलगा? तालुक्यात खळबळ, पोलिसांकडून कथित व्हिडीओचा पंचनामा
| Edited By: | Updated on: Sep 27, 2021 | 12:08 AM
Share

जळगाव : सोशल मीडियावर नेमकं काय व्हायरल होईल याचा काहीच थांगपत्ता नाही. याशिवाय लोकांना गंडवण्यासाठी किंवा परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी अंधश्रद्धेचा अवलंब करुन अफवा पसरवण्याचा अनेकांचा हेतू असतो. अशाप्रकारचं कृत्य करणाऱ्यांना आपण समाजकंठकच म्हणतो. अशाच काही समाजकंठकांच्या मुसक्या आवळण्यात फत्तेपूर पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. या तिघांनी शिर नसलेला धड आणि उलट्या पावलांची भूतं अशा आशयाचा एक कथित व्हिडीओ बनवला होता. त्याच कथित व्हिडीओमुळे संबंधित परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

संबंधित प्रकार हा जळगावच्या जामनेर तालुक्यातील पहुर येथील आहे. भुतांचा कथित व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या तिघांना फत्तेपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपींची चौकशी केली असता त्यांनी आपलं कृत्य कबूल केलं. त्यानंतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींच्या या कृत्यामुळे पहूर, फत्तेपूर, देऊळगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

आरोपींनी नेमकं काय केलं?

आरोपींनी रात्रीच्या अंधारात रस्त्यावर एका कारमध्ये बसून व्हिडीओ बनवला. यावेळी त्यांनी शिर नसलेला एक मुलगा आणि एक महिला रस्त्याने उलट्या पावली चालत असल्याचं कथित दृश्य तयार केलं. विशेष म्हणजे आरोपींनी कारचा डिप्पर लाईट लावत हा सगळा प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला. तसेच या सगळ्या प्रकाराचा आपण साक्षीदार असल्याचं दाखवत आपली प्रतिक्रिया नेमकी काय ते दर्शवण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी त्यानंतर सोशल मीडियावर पटाळ फाट्यावर भूत फिरत असल्याचा मजकूर टाकून संबंधित व्हिडीओ शेअर केला.

आरोपींनी शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडीओमुळे फत्तेपूर तोरणाळा, देऊळगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. तसेच जामनेर तालुक्यातही चर्चा पसरली. अखेर याबाबतची माहिती फत्तेपुर येथील काही सुज्ज्ञ नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यावरुन फत्तेपूर औट पोस्टच्या पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेऊन रात्री उशिरा पहूर पोलीस ठाण्यात तपासणीसाठी हजर केले. त्यांची चौकशी केला असता संबंधित व्हिडीओ हा बनावट असल्याचं उघड झालं.

संबंधित घटनेचा व्हिडीओ बघा

पोलिसांची प्रतिक्रिया काय?

संबंधित घटनेविषयी पहुर पोलीस ठाण्याचे एपीआय संजय बनसोड यांनी प्रतिक्रिया दिली. “जामनेरच्या पहुर येथील कथित भुताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. संबंधित व्हिडीओ ज्या इसमांनी व्हायरल केलाय त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित व्हिडीओ बनावट आणि खोटा आहे. जनतेमध्ये भीती निर्माण करण्यासाठी हा व्हिडीओ तयार केला आहे. त्यामुळे जनतेने घाबरुन जाऊ नये. भूत वगैरे नसतात. तसेच अशाप्रकारचे व्हिडीओ व्हायरल करुन लोकांमध्ये भीती निर्माण करु नये. कुणी तसा प्रयत्न केल्यास त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई होऊ शकते”, असा इशारा संजय बनसोड यांनी दिला.

हेही वाचा :

IDEO : चोर ते चोर वर शिरजोर, नागपुरात महावितरण कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला, मन हेलावणारं कृत्य, कारण फक्त….

VIDEO : फरसाण खाताय तर सावधान! कचऱ्यातून फरसाण वेचणाऱ्या इसमाचा व्हिडिओ व्हायरल

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.