दुसऱ्यांच्या वादात पडणे तरुणाला अंगलट आले, तिघांनी मिळून त्यालाच संपवले !

यश गावडे आणि त्याच्या एका मित्राचा वाद झाला होता. तो वाद सोडवण्यासाठी रेहमानने मध्यस्थी केली होती. त्यानंतर काही दिवसानंतर रेहमान आणि यश यांचा वाद झाला होता.

दुसऱ्यांच्या वादात पडणे तरुणाला अंगलट आले, तिघांनी मिळून त्यालाच संपवले !
नोकरीच्या वादातून दिल्लीत तिहेरी हत्याकांड
Follow us
| Updated on: Nov 01, 2022 | 4:28 PM

इचलकरंजी : जुन्या वादातून एका पानपट्टी चालकाची धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी रात्री इचलकरंजी येथील विठ्ठल नगर येथे घडली आहे. रेहमान मलिक नदाफ असे हत्या करण्यात आलेल्या 22 वर्षीय पानपट्टी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी शहापूर पोलिसात हत्येची नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. यश गावडे, आतिफ चिकोडे आणि साहिल माच्छरे अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

मित्राचा वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी केली

रेहमान याने दोन महिन्यांपूर्वीच पानपट्टीचा व्यवसाय सुरू केला होता. यश गावडे आणि त्याच्या एका मित्राचा वाद झाला होता. तो वाद सोडवण्यासाठी रेहमानने मध्यस्थी केली होती. त्यानंतर काही दिवसानंतर रेहमान आणि यश यांचा वाद झाला होता.

घराशेजारी बोलावून तिघांनी हल्ला केला

याच कारणातून तिघा संशयितांनी सोमवारी रात्रीच्या सुमारास रेहमान याला घराशेजारी बोलावून घेतले. तेथे त्याच्यावर वार केले. गुन्हा केल्यानंतर आरोपींनी तेथून पलायन केले होते. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत रेहमानला इचलकरंजी येथील रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

पोलीस केवळ आठ आरोपींच्या मुसक्या आवळल्या

अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, डीवायएसपी रामेश्वर वैजने, शिवाजीनगर पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, शहापूर सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली. पोलिसांनी कसून शोध घेत केवळ आठ तासात आरोपींना गजाआड केले. अधिक तपास शहापूर पोलीस करीत आहेत.

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.