गाडीवरुन चालताना धक्का लागला, बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत, तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

रात्रीच्या समयी गाडीने जात असताना धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे (Youth killed with a sharp weapon in Nagpur)

गाडीवरुन चालताना धक्का लागला, बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत, तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

नागपूर : रात्रीच्या समयी गाडीने जात असताना धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरच्या कळमना पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे (Youth killed with a sharp weapon in Nagpur).

गुरुवारी (28 जानेवारी) रात्री अकरा वाजेच्या सुमारास 26 वर्षीय तरुण करण वर्मा दुचाकीवरुन कामठीच्या दिशेला जात होता. तर दुसरा 18 वर्षीय तरुण फैजान परवेझ मौसुरी हा नागपूरच्या दिशेला जात होता. दरम्यान कळमना परिसरात दोघांचा एकमेकांना धक्का लागला. त्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. सुरुवातीला दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर या बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत झालं. आरोपी फैजानने करण वर्मावर धारधार शस्त्राने सपासप वार केले.

या हाणामारीत करण वर्मा तरुण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दुसरीकडे पोलिसांनी आरोपी फैजान परवेझ मौसुरी याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.

या घटनेनंतर नागपूर शहरातील गुन्हेगारांची सहनशक्ती आता कमी झाली की काय? असे प्रश्न पुढे यायला लागले आहेत. कारण गुन्हेगारांची अगदी शुल्लक कारणावरून सुद्धा हत्या करण्यापर्यंत मजल जाताना दिसत आहे. त्याचबरोबर गुन्हेगारांना पोलिसांचा धाक कमी झाला की काय? असा प्रश्न उपस्थित केला जातोय (Youth killed with a sharp weapon in Nagpur).

हेही वाचा : तुम्ही खरेदी केलेली बुलेट चोरीची तर नाही?  

Published On - 7:38 pm, Fri, 29 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI