AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पठ्ठ्या आठवी नापास, तरी 400 महिलांचे अकाऊंट हॅक, तुम्हाला सावध करणारी बातमी

विशेषत: मुली आणि महिलांचे सोशल मीडियावरचे फोटो किती असुरक्षित आहेत याचा अंदाज येऊ शकतो.

पठ्ठ्या आठवी नापास, तरी 400 महिलांचे अकाऊंट हॅक, तुम्हाला सावध करणारी बातमी
सोशल मीडिया अकाऊंट हॅक
| Updated on: Jan 29, 2021 | 7:06 PM
Share

लखनौ : तुम्ही जर फेसबुक, इन्स्टावर सातत्यानं फोटो टाकत असाल तर लखनौमध्ये घडलेली घटना डोळे उघडवणारी आहे. विशेषत: मुली आणि महिलांचे सोशल मीडियावरचे फोटो किती असुरक्षित आहेत याचा अंदाज येऊ शकतो. तुम्ही जर फेसबुक किंवा इतर ठिकाणी फोटो शेअर करत असाल तर त्याचा वापर ब्लॅकमेलिंगसाठी होऊ शकतो हे दाखवणारी घटना उत्तर प्रदेशात घडलीय. (8th fail boy hacks four hundred  social media accounts of women at Uttar Pradesh )

लखनौमध्ये नेमकं काय घडलं?

विनीत मिश्रा नावाचा एक तरूण एका तरूणीला ब्लॅकमेल करत होता. तुझे आक्षेपार्ह फोटो माझ्याकडे आहेत, ते सार्वजनिक होऊ द्यायचे नसतील तर पैशांची सोय कर अशी मागणी करायचा. पीडित मुलीनं लखनौच्या सायबर क्राईममध्ये तक्रार दाखल केली. पोलीसांनी तपास केला आणि विनीतच्या मुसक्या आवळल्या. पण विनीतचा तपास केला असता जे सत्य समोर आलं त्यानं पोलीसही चक्रावले.

आठवी नापास तरी 400 महिलांचे अकाऊंट हॅक 

विनीत मिश्रा हा आठवी नापास आहे, पण तो मुली आणि महिलांचे फेसबुक हॅक करण्यात तरबेज होता. तो मुलींच्या फेसबुक अकाऊंटवर जायचा, तिथून फोटो वगैरे डाऊनलोड करायचा. त्याची एक लिंक तयार करायचा आणि तिच लिंक तो मुलींना ब्लॅकमेल करण्यासाठी पाठवायचा. लिंक ओपन होण्यासाठी तो संबंधीत मुलींचा मेल वगैरे मागायचा. त्यातून पुन्हा अकाऊंट हॅक करायचा. असं त्यानं एक दोन नाही तर जवळपास चारशे पेक्षा जास्त मुलींचं अकाऊंट हॅक करून ब्लॅकमेल करायचा.

राहा सावध !

विनीत मिश्राचा फोन आणि इतर साहित्य पोलीस खंगाळतायत. पण महिलांनी फोटो शेअर करताना ते पूर्णपणे सुरक्षित असावेत याची काळजी घेण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय.

संबंधित बातम्या 

तुम्ही खरेदी केलेली बुलेट चोरीची तर नाही?  

WhatsApp Alert: 100 हून अधिक मुलींचे व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट हॅक, सुरक्षेसाठी सोप्या टिप्स    

Cyber Attack Alert | ‘या’ ईमेल आयडीना बळी पडू नका, भारतावर मोठ्या सायबर हल्ल्याचा इशारा 

(8th fail boy hacks four hundred  social media accounts of women at Uttar Pradesh )

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.