AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बहिणीची छेड काढल्याचा राग आला, भावानं केलं भयंकर कृत्य, संपूर्ण नाशिक शहरच हादरलं…

नाशिकच्या निलगिरी बाग परिसरात एका विकास नलावडे तरुणावर सुरुवातीला हल्ला झाल्याची बाब समोर आली होती, त्यानंतर नाशिकच्या आडगाव पोलीसांच्या तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे.

बहिणीची छेड काढल्याचा राग आला, भावानं केलं भयंकर कृत्य, संपूर्ण नाशिक शहरच हादरलं...
buldhana Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Feb 23, 2023 | 12:48 PM
Share

नाशिक : नाशिकच्या आडगाव पोलीस ( Nashik City Police ) ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक हत्या झाल्याची घटना ( Crime News ) समोर आली होती. त्यानंतर हत्येमागील कारण समोर आल्याने नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. नाशिक शहरातील निलगिरी बाग परिसरात ही घटना घडली असून संपूर्ण शहर या घटणेने हादरलं आहे. बहिणीची छेड काढणाऱ्या तरुणाचा काटा काढण्यासाठी भावाने धारधार शस्त्राने वार करून हत्या केल्याची बाब समोर आली आहे. निलगिरी बाग परिसरात विकास नलावडे या पंचवीस वर्षीय तरुणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे.

नाशिकच्या निलगिरी बाग परिसरात राहणारा विकास नलावडे हा संशयित आरोपीच्या बहिणीची नेहमीच छेड काढत होता. हीच बाब बहिणीने आपल्या भावाला सांगितली होती. त्यावरून भावाने विकास नलावडे याला ताकीद दिली होती.

मात्र, बहिणीची छेड वारंवार काढत असल्याने संशयित आरोपी अमोल साळवे आणि त्याच्या मित्राने विकास नलावडे याला निलगिरी बाग परिसरात भेटायला बोलावले होते. त्याच वेळी मीच तुझ्या बहिणीशी लग्न करणार असल्याचे म्हंटले होते.

विकास नलावडे याने लग्नाचा विषय काढताच राग आलेल्या भाऊ अमोल साळवे आणि त्याच्या सहकारी मित्राने त्याच्यावर धारधार शस्त्राने वार करून खून केला. विकास रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतांना एका नागरिकाने पाहिले होते.

परिसरातील नागरिकांच्या मदतीने विकासला मेडिकल कॉलेज येथे उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र, तोपर्यंत विकास याचा मृत्यू झाला होता डॉक्टर यांनी तपास करून मृत घोषित केले.

याच दरम्यान आडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इरफान शेख यांनी घटनास्थळी धाव घेत, तपास सुरू केला होता. आडगाव पोलीस ठाण्यातील पोलीसांनी तात्काळ यातील संशयित आरोपी आणि त्याचा साथीदार यांना अटक केली आहे.

संशयित आरोपी याने गुन्ह्याची कबुली दिली असून आडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने आडगाव परिसरासह शहरात खळबळ उडाली असून खुनाच्या घटनेची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

आडगाव परिसरातील निलगिरी बाग येथे खुनाची घटना घडल्याने परिसरात उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे. आडगाव पोलीस अधिकचा तपास करत आहे. त्यामुळे या खुनाच्या घटनेत आणखी काही बाबी समोर येतात का ? हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच