AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अलिशान बंगला, लक्झरी गाड्या, 24 लाखाची रोख रक्कम; यूट्यूबरच्या घरात सापडला कुबेराचा खजिना

आरोपीच्या भावाने सर्व आरोपांचे खंडन केले असून खोट्या आरोपांखाली फसवण्यात येत असल्याची टीका त्याने केली आहे.

अलिशान बंगला, लक्झरी गाड्या, 24 लाखाची रोख रक्कम; यूट्यूबरच्या घरात सापडला कुबेराचा खजिना
हॉटेलमध्ये जेवायला चाललेल्या तरुणावर हल्ला
| Updated on: Jul 17, 2023 | 1:49 PM
Share

बरेली : उत्तर प्रदेशातील बरेली (bareli) येथे रविवारी रात्री पोलिसांनी एका यूट्यूबरच्या (youtuber) घरावर छापा मारला. या छाप्यामध्ये पोलिसांनी यूट्यूबरच्या घरातून 24 लाख रुपयांची रोकड सापडली. यानंतर पोलिसांनी तत्काळ या छाप्याची सूचना आयकर विभागाच्या (Income tax department) अधिकाऱ्यांना दिली. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून लाखो रुपयांची ही रक्कम जप्त केली आहे.

हा यूट्यूबर अवैध मार्गाने लाखो रुपये कमावत असून त्याने घरात ही रोकड ठेवली असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी मिळाली होती. याच माहितीवरून पोलिसानी त्याच्या घरावर छापा मारला होता. तसलीम असे या यूट्यूबरचे नाव असून तो त्याच्या चॅनेलच्या माध्यमातून लोकांना शेअर मार्केटशी संबंधित माहिती द्यायचा. बरेलीतील नवाबगंज येथील मिलक गावात ही घटना घडली. अटक करण्यात आलेला आरोपी हा बीटेक पास असून त्याने अवैध मार्गाने पैसे कमावून आलिशान घर बांधल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे. तसेच त्याच्याकडे अनेक लक्झरी गाड्याही असल्याते समजते.

2017 मध्ये बनवलं होतं यूट्यूब चॅनेल

मात्र तसलीमच्या सांगण्यानुसार तत्याने बीटेकचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर 2017 च्या ऑक्टोबर महिन्यात यूट्यूबवर एक चॅनेल तयार केले होते. त्याद्वारे तो शेअर मार्केटची माहिती देत असे. आत्तापर्यंत त्याने चॅनलद्वारे 1.20 कोटी रुपये कमावले आहेत. यासोबतच 40 लाख रुपयांचा करही भरला आहे. त्याच्या घरातून जी 24 लाखांची रक्कम मिळाली त्याबाबत त्याने सांगितले की 24 लाखांपैकी 10 लाख रुपये त्याला लग्नात मिळाले तर 9 लाख रुपयांची रक्कम त्याने बँकेतून काढल्याचे तसलीमने स्पष्ट केले.

चॅनेलवर आहेत 99 हजारांपेक्षा अधिक सबस्क्रायबर्स

याप्रकरणी आयकर विभागाचे अधिकारी सध्या अधिक तपास करत आहेत. तसलीमच्या यूट्यूब चॅनेलवर 99 हजारांहून अधिक सबस्क्रायबर्स असल्याचे समजते. तसलीमने गावात आलिशान घर बांधले असून त्याच्याकडे अनेक लक्झरी कार्सही असल्याचे समजते.

दरम्यान तसलीमच्या भावाने सर्व आरोपांचे खंडन केले असून भावाला फसवण्यात येत असल्याचा आरोपही त्याने लावला आहे.

कल्याण - डोंबिवलीतील ठाकरे सेनेच्या मिसिंग नगरसेवकांचे पोस्टर्स लागले!
कल्याण - डोंबिवलीतील ठाकरे सेनेच्या मिसिंग नगरसेवकांचे पोस्टर्स लागले!.
नांदेडमध्ये भाजपला पाठिंबा; शिवसेनेचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर
नांदेडमध्ये भाजपला पाठिंबा; शिवसेनेचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर.
मी जिल्ह्यात अनेकांना त्रास दिला हे खरं, पण...; खडसेंचा मोठा खुलासा
मी जिल्ह्यात अनेकांना त्रास दिला हे खरं, पण...; खडसेंचा मोठा खुलासा.
भाजपच्या झेंड्यातील हिरवा रंग एमआयएमचा आहे का? अंधारेंचा खोचक सवाल
भाजपच्या झेंड्यातील हिरवा रंग एमआयएमचा आहे का? अंधारेंचा खोचक सवाल.
हजारो आदिवासी व शेतकऱ्यांचे ‘लाल वादळ’ मंत्रालयाच्या दिशेने
हजारो आदिवासी व शेतकऱ्यांचे ‘लाल वादळ’ मंत्रालयाच्या दिशेने.
महाराष्ट्र हिरवा करण्याची कुणाची हिंमत नाही; मोहोळ स्पष्टच बोलले
महाराष्ट्र हिरवा करण्याची कुणाची हिंमत नाही; मोहोळ स्पष्टच बोलले.
मलाड रेल्वे स्थानकातील हत्या प्रकरणाचा नवा CCTV समोर
मलाड रेल्वे स्थानकातील हत्या प्रकरणाचा नवा CCTV समोर.
मालाड रेल्वेस्थानक हत्या प्रकरण; आरोपीला अटक, काय होणार शिक्षा?
मालाड रेल्वेस्थानक हत्या प्रकरण; आरोपीला अटक, काय होणार शिक्षा?.
डोंबिवलीत मराठी मुलीच्या एकाच स्टॉलवर कारवाई, नेमकं काय घडलं?
डोंबिवलीत मराठी मुलीच्या एकाच स्टॉलवर कारवाई, नेमकं काय घडलं?.
मालाडमध्ये प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या, सीसीटीव्ही फुटेज समोर
मालाडमध्ये प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या, सीसीटीव्ही फुटेज समोर.