सेक्स रॅकेट चालवणाऱ्या बॉलिवूडच्या कास्टिंग डायरेक्टरला अटक, एका आठवड्यातील दुसरं प्रकरण

सेक्स रॅकेट चालवणाऱ्या बॉलिवूडच्या कास्टिंग डायरेक्टरला अटक करण्यात आली. एका आठवड्यामध्ये बॉलिवूडशी संबंधित सेक्स रॅकेटप्रकरणी ही दुसरी कारवाई आहे.

Bollywood Sex Racket, सेक्स रॅकेट चालवणाऱ्या बॉलिवूडच्या कास्टिंग डायरेक्टरला अटक, एका आठवड्यातील दुसरं प्रकरण

मुंबई : सेक्स रॅकेट चालवणाऱ्या बॉलिवूडच्या कास्टिंग डायरेक्टरला अटक करण्यात आली. एका आठवड्यामध्ये बॉलिवूडशी संबंधित सेक्स रॅकेटप्रकरणी ही दुसरी कारवाई आहे (Bollywood Sex Racket). बॉलिवूडशी संबंधित नवीन कुमार आर्य ऑनलाईन आणि फोनवरून सेक्स रॅकेट चालवत होता. पोलिसांनी सापळा रचून नवीन कुमार आर्यसह दोघांना अटक केली. तसेच, दोन मुलींना वाचवण्यात पोलिसांना यश आलं. या दोन्ही मुली पश्चिंम बंगालच्या राहणाऱ्या आहेत (Bollywood Sex Racket).

नवीन कुमार आर्य ऑनलाईन आणि फोनवरून सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या समाज सेवा शाखेला मंगळवारी रात्री (14 जानेवारी) मिळाली. यानंतर समाजसेवा शाखेने वर्सोवा पोलीस ठाण्याबरोबर मिळून सापळा रचला आणि अंधेरी पश्चिम येथून नवीन कुमार आर्यला अटक केली. नवीन कुमार आर्यसह बॉलिवूडच्या एका अभिनेत्री आणि मेकअप आर्टिस्टलाही अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपीचं नाव नवीन कुमार आर्य (वय 40) आहे. हा बॉलिवूडमध्ये कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम करतो. वर्सोवा पोलिसांनी पिटा अॅक्ट अंतर्गत त्याला अटक केली असून, आज (15 जानेवारी) त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने नवीन कुमार आर्यला 20 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

काही दिवसांपूर्वीच दिंडोशी पोलिसांनी बॉलिवूड संबंधित सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. ज्यामध्ये बॉलिवूडच्या दोन अभिनेत्रींचा समावेश होता. या दोन्ही सेक्स रॅकेटचा काही संबंध आहे का, या अनुषंगाने पोलीस आता पुढील तपास करत आहेत.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *