मुंबईत सेक्स रॅकेटचा धुमाकूळ, 4 दिवसात 4 सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

नववर्षाच्या अगोदर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात सेक्स रॅकेट सुरु असल्याचा प्रकार समोर (Sex Racket in Mumbai) आला आहे. गेल्या चार दिवसांमध्ये अमली पदार्थ विरोधी पथकाने चार सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.

Sex Racket in Mumbai, मुंबईत सेक्स रॅकेटचा धुमाकूळ, 4 दिवसात 4 सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

मुंबई : नववर्षाच्या अगोदर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात सेक्स रॅकेट सुरु असल्याचा प्रकार समोर (Sex Racket in Mumbai) आला आहे. गेल्या चार दिवसांमध्ये अमली पदार्थ विरोधी पथकाने चार सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या सेक्स रॅकेटमध्ये परदेशी मुलींची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याचे उघडकीस आलं आहे. भारतीय मुलींचा दर 40 हजार तर परदेशी मुलींसाठी 4 लाखापर्यंत दर (Sex Racket in Mumbai) आहे.

मुंबईच्या दादरसारख्या उच्चभ्रू परिसरात चार दिवसांपूर्वी एका मोठ्या सोसायटीमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरु असल्याचे समोर आलं होतं. हे रॅकेट पोलिसांनी उधळून लावलं होतं. त्यानंतर कुलाबा परिसरामध्ये व्हॉट्सअॅपच्या माध्यामातून चालत असलेल्या सेक्स रॅकेट उघडकीस आलं होतं. तसेच आता मुंबईतील जुहू परिसरात असणाऱ्या एका 4 स्टार हॉटेलमध्ये टिक-टॉक, बिंगो आणि इतर सोशल मीडियाच्या हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालवत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

या प्रकरणांमधील कारवाईत योगेश उर्फ युवी गहलोत आणि सुरज कुमार दशरथ मंडळ या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर उर्वरित रॅकेटचा मुख्य सूत्रधार योगेश बोहरा उर्फ टोनी, राजकुमार आणि रवी मंडल यांचा शोध सुरू (Sex Racket in Mumbai) आहे.

नववर्षाच्या सुरुवातीलाच अमली पदार्थविरोधी पथकाने वर्षभरात केलेल्या कारवाईनंतर सुद्धा खुलासा केला आहे. त्यासोबतच हजारो आणि लाखो रुपयांच्या बदल्यात सुरु असलेला गोरखधंदा सुद्धा उघडकीस आलं आहे. भारतीय आणि पाश्चिमात्य देशातल्या तरुणांना या जाळ्यात उडवून त्यांच्याकडून ही काम नोकरी आणि सीरियल्समध्ये काम देण्याचे आमिष दाखवून करून घेतली जात असल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.

जुहू परिसरात असणाऱ्या ‘झेड लक्झरी रेसिडेन्सी’ या 4 स्टार हॉटेलमधून तीन मुलींची सुखरूप सुटका करण्यात यश आले आहे. तर एकूण तीन आरोपींना अटक सुद्धा करण्यात आली असून इतर दोन जणांचा शोध सुरू आहे. हे रॅकेट चालवणारे सर्व मुख्य आरोपी परराज्यात राहून सर्व यंत्रणा हाताळत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं (Sex Racket in Mumbai) आहे.

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी या कारवाई सुरू केल्या आहेत. यात सेक्स रॅकेटचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आलं आहे. मुंबई पोलीस आणि विविध एजेंसीने 31 डिसेंबर रोजी होणारे सर्व काळे धंदे रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळेच अशा प्रकरणांच्या विरोधात मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई झाल्याचे समोर आलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *