गर्भाचं लिंग तपासण्यासाठी बायकोचं पोट फाडलं, उत्तर प्रदेशमधील पाच मुलींच्या बापाचं कृत्य

उत्तर प्रदेशमध्ये पाच मुलींच्या बापाने आपल्या गर्भवती पत्नीचे पोट फाडले (Husband attack on pregnant Wife).

गर्भाचं लिंग तपासण्यासाठी बायकोचं पोट फाडलं, उत्तर प्रदेशमधील पाच मुलींच्या बापाचं कृत्य

लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये पाच मुलींच्या बापाने आपल्या गर्भवती पत्नीचे पोट फाडले (Husband attack on pregnant Wife). पत्नीच्या पोटातील गर्भाचे लिंग तपासण्यासाठी त्याने हे कृत्य केले, असा आरोप गर्भवती महिलेच्या माहेरच्या कुटुंबियांनी केला आहे. ही घटना बदायू येथे घडली आहे. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. पन्नालाल असं गर्भवती महिलेच्या पतीचं नाव आहे (Husband attack on pregnant Wife).

ही धक्कादायक घटना सिव्हिल लायंस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेकपूर विभागात घडली आहे. पन्नालालने एका धारदार शस्त्राने आपल्या पत्नीचे पोट फाडले. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे, असं पोलीस अधिकारी प्रवीण सिंह चौहान यांनी सांगितले.

पोलिसांनी या घटनेनंतर आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पन्नालाल याला पोलिसांनी अटक केली आहे. आम्ही या गुन्ह्याचा शोध घेत आहे. जखमी महिलेला बरेलीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल केले. महिला सहा महिन्यांची गर्भवती आहे, असंही चौहान यांनी सांगितले.

पन्नालाल यांना मुलगा हवा होता. पत्नीच्या पोटातील गर्भ मुलाचे आहे की मुलीचे हे पाहण्यासाठी त्याने पत्नीचे पोट फाडले, असा आरोप गर्भवतीच्या माहेरच्या लोकांनी केला आहे.

क्रिकेटर सुरेश रैनाच्या पत्नीचं ट्वीट

बदायूमधील घटनेवर भारतीय क्रिकेटर सुरेश रैनाची पत्नी प्रियंका चौधरी रैनाने ट्वीट केले आहे. प्रियंका म्हणाली, यापेक्षा धक्कादायक काही असू शकत नाही. मुलगा पाहिजे हा हट्ट लोकांचा कधी संपणार? ही घटना खूप भयानक आहे. यामध्ये महिला जीवन आणि मृत्यूचा संघर्ष करत आहे.

संबंधित बातम्या :

उपचाराचं बिल पाहून चक्कर, बोईसरमध्ये रुग्णाची हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

 

तू कोट्यधीश होणार, फेक कॉलमुळे मित्रांचे ‘खयाली पुलाव’, वादावादीतून तरुणाची हत्या

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *