नागपूर-भंडारा मार्गावर वाहनांची वर्दळ, पेट्रोल पंपाजवळ इसम मृतावस्थेत पडलेला, मृतदेहावर धारदार शस्त्रांचे वार

नागपूर शहरातील पारडी पोलीस ठाणे हद्दीतील कापसी पुलाजवळ असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ एका इसमाचा मृतदेह आढळून आला आहे (Man murdered on Nagpur-Bhandara road).

नागपूर-भंडारा मार्गावर वाहनांची वर्दळ, पेट्रोल पंपाजवळ इसम मृतावस्थेत पडलेला, मृतदेहावर धारदार शस्त्रांचे वार

नागपूर : नागपूर शहरातील पारडी पोलीस ठाणे हद्दीतील कापसी पुलाजवळ असलेल्या पेट्रोल पंपाजवळ एका इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. त्या मृतदेहावर धारदार शस्त्रांनी वार केल्याच्या जखमा आढळून आल्या आहेत. त्यावरुन त्याचा खून झाल्याचा निष्कर्श पोलिसांनी काढला आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे (Man murdered on Nagpur-Bhandara road).

दरम्यान, परिसरातील एखाद्या सीसीटीव्हीमध्ये मृतक आणि आरोपी चित्रित झालेत का? याचादेखील शोध पोलिसांनी सुरु केला आहे. खुनाच्या घटनेची माहिती पसरताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र मृतक त्या परिसरातील नसल्याने त्याची ओळख पटलेली नव्हती. पंचनामा दरम्यान मृतकच्या खिशात आढळून आलेल्या काही कागदपत्रांनुसार मृतदेह दिलीप राऊत नामक इसमाचा असल्याचं निष्पन्न झालं आहे.

नागपूर- भंडारा मार्गावरील पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कापसी परिसर आहे. राष्ट्रीय महामार्ग असल्याने या भागात ट्रकसह मोठ्या वाहनांची वर्दळ असते. या परिसरात आज (29 ऑक्टोबर) दुपारच्या सुमारास कापसी परिसरात असलेल्या एचपी पेट्रोल पंपाजवळ एक इसम मृतावस्थेत पडलेला असल्याची माहिती पारडी पोलिसांना समजली.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून तपासाला सुरुवात केली. तेव्हा त्या मृतदेहावर जखमा आढळून आल्या. रात्री काही आरोपींनी या इसमाचा खून केल्यानंतर फरार झाले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी बांधून तपासाला सुरुवात केली आहे. हा मृतदेह दिलीप राऊत नामक इसमाचा असून तो गोंदिया येथील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे. मृतक कुणासोबत इथपर्यंत आला याचा ही शोध सुरु केला आहे (Man murdered on Nagpur-Bhandara road).

हेही वाचा :

पुतण्याला शिवीगाळ केल्यावरुन वाद, नागपुरात घरात घुसून शेजाऱ्याची निर्घृण हत्या

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *