मेव्हणीने प्रेमात फसवलं, पित्याची तीन मुलांना विष पाजून आत्महत्या

रवींद्र यांनी 11 वर्षांची मुलगी अनुष्का, मुलगा अजिंक्य आणि आयुष यांना कोल्डड्रिंकमधून विष पाजलं. त्यानंतर गळफास घेऊन रआत्महत्या केली.

Pandharpur Father Kills Children, मेव्हणीने प्रेमात फसवलं, पित्याची तीन मुलांना विष पाजून आत्महत्या

पंढरपूर : मेव्हणीने प्रेमात विश्वासघात केल्याचा राग डोक्यात घालून तरुणाने टोकाचं पाऊल उचललं. पोटच्या तीन मुलांना विष पाजून पित्याने आत्महत्या (Pandharpur Father Kills Children) केल्याचा धक्कादायक प्रकार पंढरपुरात घडला आहे.

माढा तालुक्यातील बेंबळे गावात घडलेल्या घटनेमुळ सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 35 वर्षीय रवींद्र प्रभाकर लोखंडे यांचे मेव्हणीशी अनैतिक संबंध होते. मात्र तिने प्रेमात फसवल्याचा राग रवींद्र यांच्या जिव्हारी लागला.

रवींद्र यांनी 11 वर्षांची मुलगी अनुष्का, नऊ वर्षांचा मुलगा अजिंक्य आणि सहा वर्षांचा मुलगा आयुष यांना कोल्डड्रिंकमधून विष पाजलं. त्यानंतर गळफास घेऊन रवींद्र यांनीही आत्महत्या केली. अजिंक्य आणि आयुष यांचा विषबाधेने मृत्यू झाला, तर अनुष्का बचावली आहे.

ऐन लग्नातच वधू-वरपक्षात राडा, एकमेकांवर खुर्च्यांची फेकाफेक

रवींद्र प्रभाकर लोखंडे यांचे मेव्हणीसोबत अनैतिक संबंध असल्याचा उलगडा पोलिस तपासात झाला आहे. रवींद्र यांच्या खिशात एक चिठ्ठी आणि मोबाइल सापडला. चिठ्ठीमध्ये त्यांनी मेव्हणी सुनिता कांबळे हिच्याशी आपले प्रेमसंबंध असल्याचा उल्लेख केला आहे.

सुनिताने विश्वासघात केल्याने तिच्या गावी माझ्या मुलांची हत्या करुन मी आत्महत्या करत आहे. यासाठी सर्वस्वी सुनिता कांबळे हीच जबाबदार असल्याचं त्यांनी चिठ्ठीत नमूद केल्याची माहिती आहे.

मृत्युमुखी पडलेले सर्व जण इंदापूर तालुक्यातील वडापुरी गावचे रहिवासी (Pandharpur Father Kills Children) आहेत. या प्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *