रांजणगावात 'लिव्ह इन' जोडप्यात वाद, प्रियकराकडून गर्भवती प्रेयसीची हत्या

रांजणगाव औद्योगिक वसाहत परिसरातील कारेगावात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यात प्रेयसीच्या गरोदरपणावरुन वाद झाला

रांजणगावात 'लिव्ह इन' जोडप्यात वाद, प्रियकराकडून गर्भवती प्रेयसीची हत्या

पिंपरी चिंचवड : रांजणगावात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यातील प्रियकराने प्रेयसीची हत्या केली. प्रेयसीच्या गरोदरपणावरुन सुरु असलेल्या वादातून प्रियकराने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आहे. (Pimpari Chinchwad Boyfriend Kills Girlfriend Murder over Pregnancy Dispute)

रांजणगाव औद्योगिक वसाहत परिसरातील कारेगाव येथे संबंधित जोडपे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. किरण फुंदे असे आरोपी प्रियकराचे नाव असून त्याने प्रेयसी सोनामनी सोरेन हिची हत्या केल्याचा आरोप आहे

प्रेयसीचा गळा दाबून हत्या केल्यानंतर आरोपी पोलीस स्टेशनला स्वतः हजर झला. आपणच आपल्या गर्लफ्रेंडचा खून केल्याची कबुली त्याने दिली. मला फाशी द्या, अशी मागणीही आरोपी प्रियकर किरण फुंदे याने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये केली.

कारेगावमध्ये किरण फुंदे आणि सोनामनी सोरेन हे दोघे एकत्र रहात होते. सोनामनी गर्भवती झाल्याने दोघांमध्ये वाद उद्भवला. गर्भ वाढवायचा नसल्याचे प्रियकर किरण याचे म्हणणे होते. यावरुन दोघांमध्ये वाद सुरु झाला.

याच वादातून किरणने राहत्या घरी सोनामनीचा गळा आवाळून हत्या केली आणि घराला बाहेरुन कुलूप लावून तो थेट रांजणगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला. हत्या केल्याची कबुली देत आपण केलेल्या कृत्याची शिक्षा म्हणून फाशी द्या, असे लिहिलेला कागद त्याने पोलिसांकडे सुपूर्द केला.

(Pimpari Chinchwad Boyfriend Kills Girlfriend Murder over Pregnancy Dispute)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *