बुलडाण्यात वेश्याव्यवसाय करणाऱ्या गेस्ट हाऊसवर पोलिसांची धाड

बुलडाण्यात वेश्याव्यवसाय करणाऱ्या गेस्ट हाऊसवर पोलिसांची धाड

बुलडाणा : शेगाव येथील भाग्यश्री पॅलेस गेस्ट हाऊवर पोलिसांनी धाड टाकत वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या चार जणांना ताब्यात घेतलं आहे. भाग्यश्री गेस्ट हाऊसमध्ये सर्रास वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती खामगाव येथील एसडीओपी पथकाला मिळाली होती. रात्री टाकण्यात आलेल्या धाडीत दोन मुलींसह चौघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. वेश्याव्यवसाय करणाऱ्या दोन मुलींना सुधारगृहात पाठवण्यात आलं असून इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथे भाविकांची रात्रं-दिवस गर्दी असते. त्यामुळे शहरातील लॉज, हॉटेलवर वेश्याव्यवसाय जोमात चालतो आणि यामुळे संतनगरीचे नावही बदनाम होत आहे. शहरातील भाग्यश्री पॅलेस गेस्ट हाऊसमध्ये महिलांसह  मुलींना आणून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय केला जात असल्याची गुप्त माहिती खामगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी पथकला मिळाली होती. यावरून पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून शहानिशा करत बनावट ग्राहकाने इशारा करताच छापा टाकण्यात आला. यामध्ये नागपूर आणि अमरावती येथील दोन युवतींना ग्राहकांजवळ वेश्याव्यवसाय करण्यासाठी पाठवले जात असल्याचे निदर्शनास आले.

गेस्ट हाउस व्यवस्थापक हुसैन खान, अजगर खान आणि ग्राहक नितिन अरुण कलंकेसह दोन्ही मुलींना ताब्यात घेण्यात आलं आहे. यासर्वांना पोलीस स्टेशनमध्ये आणून गेस्ट हाउस व्यवस्थापक, ग्राहक आणि युवती विरोधात अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. वेश्याव्यवसाय करणाऱ्या दोन्ही मुलींना सुधारगृहात पाठवले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

यापूर्वी सुद्धा शेगावमधील अनेक लॉज, हॉटेल, गेस्ट हाऊसवर पोलिसांनी छापे टाकून अशाप्रकारे वेश्याव्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. मात्र हे प्रकार शेगावमध्ये सर्रासपणे चालत आहे. यामुळे शेगावचे नाव बदनाम होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *