नागपुरात ऑनलाईन देहविक्रीचा व्यवसाय, दोघांना अटक, मुख्य सूत्रधाराचा शोध सुरु

लॉकडाऊनच्या काळात एका वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने देह व्यापाराचा व्यवसाय सुरू होता. (Prostitution Business In Nagpur Two People Arrested)

नागपुरात ऑनलाईन देहविक्रीचा व्यवसाय, दोघांना अटक, मुख्य सूत्रधाराचा शोध सुरु

नागपूर : ऑनलाईन पद्धतीने देह व्यापाराचा व्यवसाय चालविणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली आहे. नागपूरमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. यात परराज्यातील दोन तरुणींची सुटका केली आहे. (Prostitution Business In Nagpur Two People Arrested)

लॉकडाऊनच्या काळात एका वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने देह व्यापाराचा व्यवसाय सुरू होता. अनेक ग्राहकांना घरपोच सेवा किंवा जागा उपलब्ध करून देऊन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे वसूल केले जात होते. यासाठी ऑनलाईन पद्धत आणि मोबाईलचा वापर होत असे.

त्यामुळे हे आरोपी हातात येत नव्हते. त्यानंतर पोलिसांनी यावर आपलं लक्ष केंद्रित करत याबाबतची माहिती मिळवली.

नागपुरातील मनीष नगर भागातून हा व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाने सापळा रचत या ठिकाणी धाड टाकली. त्यावेळी हा व्यवसाय चालविणारे दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. तसेच परराज्यातून आलेल्या दोन तरुणींचीही सुटका करण्यात आली आहे. मात्र याचा मुख्य सूत्रधार अजूनही मिळालेला नसून त्याचा शोध सुरू आहे. (Prostitution Business In Nagpur Two People Arrested)

संबंधित बातम्या : 

उसने दिलेले पैसे परत न केल्याने मुंबईतील व्यापाराचे अपहरण, पुण्यातून चौघांना अटक

हँडल लॉक तोडून गाडीला आपली नंबर प्लेट, नागपुरात सराईत बाईकचोर जेरबंद

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *