शिक्षकांचा प्रताप, विद्यार्थ्यांना शाळेतच बलात्काराचे प्रात्यक्षिक

आंध्र प्रदेशच्या एका सरकारी शाळेत दोन शिक्षकांवर बलात्काराचे प्रात्यक्षिक (Rape Demo) दाखवण्याचा आरोप करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील आहे.

शिक्षकांचा प्रताप, विद्यार्थ्यांना शाळेतच बलात्काराचे प्रात्यक्षिक
Follow us
| Updated on: Aug 03, 2019 | 2:01 PM

हैदराबाद : शाळेतच विद्यार्थ्यांकडून बलात्काराचे प्रात्यक्षिक (Rape Demo) करुवून घेतल्याचा प्रताप सरकारी शाळेतील शिक्षकांनी केला आहे. आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. या घटेमुळे संतप्त ग्रामस्थांनी आरोपी दोन शिक्षकांना बेदम मारहाण केली. यानंतर शिक्षण विभाग खडबडून जागा झाला. “चिंतलपुडी मंडलमध्ये झालेल्या घटनेची सत्यता तापसण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे”, असं शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले.

आंध्र प्रदेशातील शाळेत बलात्काराचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी विद्यार्थिनीचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. शिक्षकांनीच हे प्रात्यक्षिक करण्यास सांगितलं होतं. मात्र या प्रकरणाचा तपास जिल्हा शिक्षण अधिकारी आणि मंडल शिक्षण अधिकाऱ्यांनी केली असता, त्यांनी असा प्रकार घडला नसल्याचा दावा केला आहे.

“अशा प्रकारची एकही घटना घडली नाही. तिसरीतील तीन विद्यार्थ्यांमध्ये भांडण झाले होते. ज्यामध्ये दोन मुलं आणि एका मुलीचा समावेश होता. त्यामुळे मुलीला जखम झाली आहे. बलात्काराच्या प्रात्यक्षिकासाठी विद्यार्थिनीचा वापर केला असा काही पुरावा मिळालेला नाही”, असं मंडल शिक्षण अधिकाऱ्यांनी जिल्हा शिक्षण अधिकारी सीवी रेणुका यांना पाठवलेल्या अहवालात म्हटलं आहे.

“मी स्वत: शनिवारी (3 ऑगस्ट) शाळेला भेट देणार आहे.  नेमकं वर्गात काय घडलं याची माहिती करुन घेईन”, असं जिल्हा शिक्षण अधिकारी सीवी रेणुका यांनी सांगितले.

चिंतलपुडी पोलिसांसोबत संपर्क केला असता अजूनपर्यंत शिक्षकांविरोधात एकही तक्रार दाखल झालेली नाही.

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.