AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बंगालमधून फसवून आणून चिपळूणमध्ये वेश्या व्यवसाय, दोन मुलींची थरारक सुटका

पश्चिम बंगालमधून 2 मुलींना फसवून आणून वेश्या व्यवसायाच्या खाईत फेकल्याची घटना खेर्डी येथे घडली. (girls prostitution business rescue)

बंगालमधून फसवून आणून चिपळूणमध्ये वेश्या व्यवसाय, दोन मुलींची थरारक सुटका
| Updated on: Nov 28, 2020 | 5:01 PM
Share

रत्नागिरी : पश्चिम बंगालमधून 2 मुलींना फसवून आणून वेश्या व्यवसायाच्या (prostitution) खाईत फेकल्याची धक्कादायक घटना चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथे घडली. नोकरी लावून देतो असं सागत या मुलींना महाराष्ट्रात आणल्याचं सांगण्यात येत आहे. मागील दोन महिन्यांपासून या मुलींवर अत्याचार करण्यात येत होते. हा प्रकार समजताच हेल्प फाऊंडेशन आणि पोलिसांच्या मदतीने थरारकपणे या मुलींची सुटका करण्यात आली. (Two girls have been rescued from prostitution business in Ratnagiri)

या दोन्ही मुलींची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांच्यावर अत्याचार झाल्याचे सिद्ध झालं आहे. याप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील मुलींना नोकरीचे आमिष दाखवत जिल्ह्यातील चिपळूमधील खेर्डी येथे आणण्यात आले. यातील एक मुलगी ही अल्पवयीन आहे. खेर्डी शहरात आणल्यानंतर त्यांना धमक्या देत तसेच मारहाण करत त्यांना त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आले. मागील दोन महिन्यांपासून त्याच्यावर हा अत्याचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेल्प फाऊंडेशनला समजताच आरोपी गर्भगळीत

मुलींवरील अत्याचाराचा सुगावा हेल्प फाऊंडेशन या सामाजिक संस्थेला लागला. संस्थेचे अध्यक्ष सतीश कदम यांनी या मुलींची तातडीने भेट घेतली. यावेळी संस्थेचे सदस्य श्रीधर भुरणही उपस्थित होते. सतीश कदम यांनी मुलींची भेट घेतल्याचे संशयिताला समजले. मुलींना जबरदस्तीने वेश्याव्यसाय करायला लावण्याचा हा प्रकार बाहेर समजल्याचे कळताच आरोपी गर्भगळीत झाला. त्यांनतर संशयिताने मुलींना पुन्हा त्रास देणे सुरु केले. त्यांना मारहाण केली. तसेच, त्यांचा मोबाईल फोनदेखील हिसकावून घेतला. तो खर्डी येथून फरार होण्याच्या बेतात होता. तर दुसरीकडे हेल्प फाऊंडेशन आणि पोलिसांना संशयिताला पकडण्याची तयारी सुरु केली. (Two girls have been rescued from prostitution business in Ratnagiri)

मुलींच्या सुटकेचा थरार

सतीश कदम यांनी घडलेल्या प्रकाराची पोलीस निरिक्षक देवेंद्र पोळ यांना कल्पना दिली. पोलिसांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेतली. त्यांनी हेल्प फाऊंडेशनच्या मादतीने संशयिताला पकडण्यासाठी सापळा रचला. या ऑपरेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सागर चव्हाण, पो.कॉन्स्टेबल आरती चव्हाण, पंकज पाडाळकर, आणि आशिष भालेकर ही टीम साध्या वेषात खेर्डीकडे रवाना झाली. हेल्प फाऊंडेशनचे पदाधिकारीदेखील त्यांच्यासोबत होते.

दरम्यान, संशयित ओरोपी पळून जाण्याच्या बेतात असताना त्यालाच आधी पडण्याचे ठरले. त्यानंतर रेस्क्यू पथकाने संशयिताला बेसावध असताना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संशयिताला पकडल्यानंतर पोलिसांनी मुलींचीदेखील सुटका केली आहे. हेल्प फाऊंडेशन आणि पोलिसांच्या या रेस्क्यू ऑपरेशनमुळे मुलींची सुटका होऊ कली. मात्र, आरोपीला अकट केल्यानंतर प्रथमिक तपासातून या रॅकेटची व्यापकता अजूनही मोठी असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Two girls have been rescued from prostitution business in Ratnagiri)

संबंधित बातम्या :

घरात झोपलेली असताना 90 वर्षीय वृद्धेवर अतिप्रसंग, नराधमाला अटक

आई-वडील मुंबईत, अभ्यासासाठी एकटाच गावी, MPSC परीक्षा पुढे गेल्याने तरुणाची आत्महत्या

कल्याणजवळ थरार, विनयभंगानंतर तरुणीला धावत्या लोकलमधून फेकण्याचा प्रयत्न, तरुणीचा जिगरबाज लढा

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.