11th Admission: अकरावी प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक कसं असेल? तुमच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथं मिळतील!

11th Admission: राज्यात अकारवीच्या प्रवेशासाठी नेमका कुठे, कधी, आणि कसा अर्ज करायचा, यासोबत अनेक प्रश्न पालकांच्या मनात आहेत. याच सगळ्या प्रश्नांची सोप्या शब्दांत उत्तर जाणून घेण्यासाठी शिक्षण विभागानं जारी केलेलं संभाव्य वेळापत्रक जाणून घेणं गरजेचं आहे.

11th Admission: अकरावी प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक कसं असेल? तुमच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथं मिळतील!
विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाचंImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 5:45 PM

पुणे : अकरावी प्रवेश प्रक्रियेचं (11th Admission process) संभाव्य वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. शिक्षण विभागाकडून (Education Department) हे वेळापत्रक जारी करण्यात आलंय. गेल्या अनेक दिवसांपासून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत पालकांच्या मनात अनेक प्रश्न होतं. विद्यार्थीही कॉलेजला जाण्यास उत्सुक आहेत. अशातच आता दिलासादायक वृत्त हाती आलंय. अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठीचं संभाव्य वेळापत्रक जारी करण्यात आलं असून यामध्ये महत्त्वपूर्ण तारखांबाबत (Important Dates of 11th Admission Process) माहिती देण्यात आली आहे. राज्यात अकारवीच्या प्रवेशासाठी नेमका कुठे, कधी, आणि कसा अर्ज करायचा, यासोबत अनेक प्रश्न पालकांच्या मनात आहेत. याच सगळ्या प्रश्नांची सोप्या शब्दांत उत्तर जाणून घेण्यासाठी शिक्षण विभागानं जारी केलेलं संभाव्य वेळापत्रक जाणून घेणं गरजेचं आहे. या वेळापत्रकार प्रवेश अर्ज कशा पद्धतीनं भरायचं आहे, कधीपर्यंत भरायचा आहे, इत्यादींबाबत महत्त्वाची माहिती जारी केली गेली आहे.

तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तर!

  1. 1 ते 14 मे या दरम्यान, प्रवेश अर्ज ऑनलाईन कसा भरायचा, याचा सराव करता येईल
  2. 17 मे पासून प्रत्यक्ष अर्ज भरण्यासा सुरुवत करण्यात येईल.
  3. 17 मे पासूनच अर्ज पडताळीची कार्यवाहीही सुरु करण्यात येईल
  4. कोण कोणत्या भागात ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया? – मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक
  5. निकाल लागण्याआधी 17 मे पर्यंत अर्जाचा भाग एक भरायचा आहे.
  6. निकाल लागेपर्यंत कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया पार पडेल
  7. निकाल लागल्यानंतर प्रवेश अर्जाचा भाग दोन भरावा लागेल
  8. भाग दोनमध्येच मुख्य प्रक्रिया असेल. यात महाविद्यालयांची निवड करणं, पसंतीक्रम निवडणं, गुणवत्ता यादी जाहीर करणं, प्रत्यक्ष प्रवेश देणं, ही प्रक्रिया होईल
  9. प्रवेश प्रक्रियेत काय काय होणार? – एक विषेश फेरी, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरीऐवजी प्रतीक्षा यादी (वेटिंग लिस्ट) करण्याचं नियोजन असेल
  10. शाळा आणि ज्युनिअर कॉलेजची नोंदणी 23 मे ते दहावीच्या निकालापर्यंत सुरु राहणार.
  11. प्रवेश प्रक्रियेची अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास http://11thadmission.org.in या वेबसाईटला भेट द्यावी
  12. शाळा आणि ज्युनिअर कॉलेजसाठी प्रशिक्षण वर्गातून पालक आणि विद्यार्थ्यांना माहिती द्वावी, असंही आवाहन शिक्षण संचालक महेश पालकर यांनी केलंय.

संबंधित बातम्या :

Railway Recruitment : उमेदवारांनो उठा, रेल्वे भरतीची वेळ झाली ! आठच दिवस बाकी आहेत अर्ज भरायला, बातमी वाचा…

Intelligence Bureau : मान सम्मान आणि प्रतिष्ठेची नोकरी करणार काय ? खाली सविस्तर बातमी दिलीये वाचा…

Ahemadnagar : नोकरी चांगली आहे फक्त ‘नगरला’ जावं लागेल ! सविस्तर माहिती खाली दिलीये वाचा…

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.