AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

HSC Result 100 Percent Marks : बारावीत 46 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाचा निकाल आज जाहीर झाला आहे. (HSC Result Declared) यंदा राज्यात बारावीचा निकाल 99.63 टक्के लागला आहे. विशेष म्हणजे यंदा राज्यातल्या 46 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजेच 100 टक्के गुण मिळाले आहेत. (46 Students have got 100 percent marks in HSC Result in Maharashtra) यावर्षी […]

HSC Result 100 Percent Marks : बारावीत 46 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Aug 03, 2021 | 3:43 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाचा निकाल आज जाहीर झाला आहे. (HSC Result Declared) यंदा राज्यात बारावीचा निकाल 99.63 टक्के लागला आहे. विशेष म्हणजे यंदा राज्यातल्या 46 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजेच 100 टक्के गुण मिळाले आहेत. (46 Students have got 100 percent marks in HSC Result in Maharashtra)

यावर्षी कोरोनास्थितीमुळे 12 वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे बारावीचा निकाल (HSC Result) हा अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने बनवण्यात आला आहे. त्यामुळे आपला निकाल काय लागेल याची सर्व विद्यार्थ्यांना उत्सुकता लागली होती. आता 12 वीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये विज्ञान शाखेचा निकाल 99.45 टक्के, कला शाखेचा निकाल 99.83 टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल 99.81 टक्के लागला आहे. एमसीव्हीसीमध्ये 98.8 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील गुणांना सर्वाधिक वेटेज

बारावी निकालासंदर्भात जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाला सर्वाधिक वेटेज दिलं गेलं. इ.10 वी मधील मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण, इ.11 वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण व इ.12 वीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय मिळालेले गुण तसेच इ.12 वी चे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण या नुसार हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दुपारी 4 वाजता विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पद्धतीनं पाहाता येईल.

निकाल पाहण्यासाठी बोर्डाने एकूण चार नव्या वेबसाईट जारी केल्या आहेत. विद्यार्थ्यांना या अधिकृत वेसबाईट्सवर त्यांचा निकाल पाहता येणार आहे.

निकाल कुठे पाहायचा?

1. https://hscresult.11 thadmission.org.in

2. https://msbshse.co.in

3. hscresult.mkcl.org 

4. mahresult.nic.in.

www.mahresult.nic.in आणि https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

काही दिवसांपूर्वी राज्यातल्या दहावी बोर्डाचा निकाल लागला होता. या निकालातही दहावीच्या तब्बल 957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले होते. तर 12 हजार 384 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला होता. कोरोनामुळे परीक्षा रद्द झाल्यानंतर अंतर्गत मूल्यमापन पद्धतीनुसार दहावी- बारावीचे निकाल जाहीर करण्यात आले. या पद्धतीचा विद्यार्थ्यांना गुणांमध्ये फायदा झाल्याचं दिसत आहे. (46 Students have got 100 percent marks in HSC Result in Maharashtra)

संबंधित बातम्या :

Maharashtra HSC Result 2021 declared LIVE Updates : बारावीचा निकाल जाहीर, msbshse.co.in वर पाहा निकाल

HSC Result 2021 Maharashtra Pass Percentage : बारावीचा निकाल जाहीर, 99.63% विद्यार्थी पास

HSC Result 2021 Maharashtra Pass Percentage: 12 विद्यार्थ्यांना 35 टक्के तर 46 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण; वाचा, 12वीचा सविस्तर निकाल

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ