CUET Exam : ‘एनटीए’ला म्हणा, ‘झालेत अर्ज भरून, द्या आता परीक्षेची तारीख’ ! भरला का पोरांनो अर्ज ? नसेल भरला तर ‘असा’ भरा

ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेला नाही त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरावा. अर्ज प्रक्रिया समाप्त झाल्यानंतर CUET च्या परीक्षेची तारीख जाहीर होऊ शकते अशी शक्यता वर्तविली जातीये. दवीपूर्व प्रवेशाच्या सीयूईटी परीक्षेसाठी २ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केलीये. सीयूईटी २०२२ ची प्रवेश परीक्षा एकूण १३ भाषांमध्ये घेतली जाणार आहे.

CUET Exam : 'एनटीए'ला म्हणा, 'झालेत अर्ज भरून, द्या आता परीक्षेची तारीख' ! भरला का पोरांनो अर्ज ? नसेल भरला तर 'असा' भरा
द्या आता परीक्षेची तारीख !Image Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 12:32 PM

नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजेन्सीद्वारे (National Testing Agency)घेतली जाणारी कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्टची (CUET) अर्ज प्रक्रिया संपत आलीये. या परीक्षेसाठी अर्ज भरायची शेवटची तारीख (Last Date) 6 मे 2022 आहे. अर्ज भरण्यासाठी काहीच दिवस बाकी असून सुद्धा एनटीए कडून अजूनही परीक्षेची तारीख जाहीर झालेली नाही. ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेला नाही त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरावा. अर्ज प्रक्रिया समाप्त झाल्यानंतर CUET च्या परीक्षेची तारीख जाहीर होऊ शकते अशी शक्यता वर्तविली जातीये. पदवीपूर्व प्रवेशाच्या सीयूईटी परीक्षेसाठी 2 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केलीये. सीयूईटी 2022 ची प्रवेश परीक्षा एकूण 13 भाषांमध्ये घेतली जाणार आहे. परीक्षेसंदर्भातली माहिती लवकरच एनटीए कडून प्रसिद्ध केली जाईल. CUET परीक्षेच्या तारखेसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाईटला भेट देत रहावी. एनटीए ने परीक्षाच पॅटर्न सुद्धा जारी केलेला आहे जो विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल. मार्किंग सिस्टम कशी असणार आहे यासंदर्भातली माहिती देखील वेबसाईटवर देण्यात आलेली आहे.

असा भरा फॉर्म

CUET च्या अधिकृत वेबसाईटवर cuet.samarth.ac.in जा

होम पेजवर न्यू रजिस्ट्रेशन येईल तिथे क्लिक करा

सगळी माहिती भरून रजिस्ट्रेशन करा आणि फॉर्म भरा

जी कागदपत्रं अपलोड करायला सांगितली आहेत ती अपलोड करा

फॉर्म फी भरा ( असेल तर )

फॉर्म सबमिट करा

फॉर्मची प्रिंट आऊट जवळ ठेवा

CUET पुढील वर्षापासून दोनदा

कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट पुढील वर्षापासून म्हणजेच 2023 पासून दोनदा घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता जे विद्यार्थी पहिल्या परीक्षेत चांगले गुण मिळवू शकले नाहीत त्यांच्याकडे चांगले गुण मिळवायची अजून एक संधी उपलब्ध असणार आहे. पुढच्या वर्षापासून या दोन्ही परीक्षा बारावीच्या परीक्षेनंतर 45 दिवसांच्या अंतराने घेतल्या जातील. जे विद्यार्थी पहिल्या संधीत चांगला स्कोअर करू शकले नाहीत ते दुसऱ्या ते दुसऱ्यांदा परीक्षा देऊन स्कोअर करू शकतात. सीयूईटी परीक्षा बारावीच्या एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.

इतर बातम्या :

Vijay Babu: अभिनेत्याविरोधात बलात्काराचा गुन्हा; म्हणाला “सहजासहजी तिची सुटका होऊ देणार नाही”

Saamana On Devendra Fadnavis : ‘फडणवीसांच्या ‘पांडू’गिरीवर ‘भाजपचे हवालदार’ चित्रपट बनेल’

कोकण हादरलं! मुख्याध्यापक निघाला नराधम, सहावीत शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.