AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay Babu: अभिनेत्याविरोधात बलात्काराचा गुन्हा; म्हणाला “सहजासहजी तिची सुटका होऊ देणार नाही”

प्रसिद्ध मल्याळम अभिनेता (Malayalam actor) विजय बाबूविरोधात (Vijay Babu) एका अभिनेत्रीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आपण काहीही चुकीचं केलं नसल्याचं सांगत विजयने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. इतकंच नव्हे तर संबंधित अभिनेत्रीविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचंही त्याने स्पष्ट केलं.

Vijay Babu: अभिनेत्याविरोधात बलात्काराचा गुन्हा; म्हणाला सहजासहजी तिची सुटका होऊ देणार नाही
Vijay BabuImage Credit source: Facebook
| Edited By: | Updated on: Apr 27, 2022 | 12:21 PM
Share

प्रसिद्ध मल्याळम अभिनेता (Malayalam actor) विजय बाबूविरोधात (Vijay Babu) एका अभिनेत्रीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आपण काहीही चुकीचं केलं नसल्याचं सांगत विजयने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. इतकंच नव्हे तर संबंधित अभिनेत्रीविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचंही त्याने स्पष्ट केलं. “मी काहीही चुकीचं केलेलं नाही. मी पीडित आहे. या देशाचा कायदा तिला संरक्षण देतोय आणि मी त्रास सहन करत असताना ती आरामात आहे. तिला इतक्या सहजासहजी सुटू देणार नाही”, असं तो फेसबुक लाईव्हदरम्यान म्हणाला. अभिनेत्रीने दाखल केलेल्या तक्रारीवरून एर्नाकुलम दक्षिण पोलिसांनी 22 एप्रिल रोजी विजय बाबूविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

काय म्हणाला विजय बाबू?

“मी मानहानीचा खटला दाखल करेन. मी तिला इतक्या सहजासहजी सुटू देणार नाही. माझ्याकडे असलेले सर्व पुरावे मी शेअर करू शकतो, पण मी तसं करणार नाही. कारण मला तिच्या कुटुंबीयांचं नुकसान करायचं नाही. मी फक्त माझी पत्नी, आई, बहीण आणि मित्रांना उत्तर देण्यास बांधिल आहे. ‘विजय बाबू दोषी नाही’ अशा छोट्याशा बातमीने हे सर्व संपू नये असं मला वाटतं,” असं तो पुढे म्हणाला.

आरोपांबद्दल सविस्तर माहिती देताना विजय म्हणाला, “ती माझ्याकडे ऑडिशनसाठी आली होती आणि तिला भूमिका मिळाली. हे सर्व झाल्यानंतर आता ती कास्टिंग काउच आणि इतर गोष्टींबद्दल बोलतेय, याचा त्रास मला होत आहे. तिने मला नैराश्यात असल्याचे मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. डिसेंबर ते मार्च 2021 पर्यंतचे तिचे सर्व मेसेज माझ्याकडे आहेत. 400 हून अधिक स्क्रीनशॉट्स माझ्याकडे आहेत. तिचे जे काही आरोप आहेत, मग ते बलात्कार किंवा सहमतीने असो, ते सर्व माझ्याकडे रेकॉर्डवर आहे,” असं विजयने स्पष्ट केलं.

अभिनेत्रीने तिच्या तक्रारीत आरोप केला की विजय बाबूने तिला फिल्म इंडस्ट्रीत अधिक चांगल्या संधी देण्याचं आश्वासन देऊन एर्नाकुलम इथल्या त्याच्या अपार्टमेंटमध्ये अनेकदा तिच्यावर अत्याचार केला. विजय बाबूवर बलात्कार आणि गंभीर शारीरिक इजा केल्याचा आरोपही तिने केला. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप विजय बाबूची चौकशी केलेली नाही. 26 एप्रिलच्या रात्री विजय बाबूने फेसबुक लाईव्हद्वारे त्याच्यावरील आरोपांवरील भाष्य केलं आणि या प्रकरणात तोच पीडित असल्याचं म्हटलंय. या लाईव्हदरम्यान त्याने पीडितेचं नावंही सांगितलं होतं.

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.