मोठं व्हायच्या स्वप्नाला बँकांचे बळ ! स्वस्तातील शैक्षणिक कर्जासाठी या बँकांचा पुढाकार

शैक्षणिक कर्ज घेऊन तुम्ही तुमची उच्च शिक्षणाची भूक भागवू शकता आणि नंतर बँकेला कर्जाची रक्कम परतफेड करु शकता. देशातील आणि विदेशातील नामांकित शैक्षणिक संस्था, विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी, विशेष अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी शैक्षणिक कर्ज काढतात.

मोठं व्हायच्या स्वप्नाला बँकांचे बळ ! स्वस्तातील शैक्षणिक कर्जासाठी या बँकांचा पुढाकार
मोठं व्हायच्या स्वप्नाला बँकांचे बळ !
Image Credit source: twitter
महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Apr 30, 2022 | 10:07 AM

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे. अनेकांना उच्च शिक्षणाची, संशोधनाची, अभ्यासाची आवड असते. त्यात अनेकदा खर्चाची अडचण येते कारण या उच्च शिक्षणासाठी (Higher Education) भरपूर पैसा लागतो. अनेकदा विदेशातच या विशेष अभ्यासक्रमाची (Specialized Course) सोय असते. दर्जेदार विद्यापीठात (University) मनाजोगता अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी खूप पैसा लागतो. शिक्षण आता सर्वसामान्यांच्या सोयीचे राहिलेले नाही. सीबीएसई आणि इंग्रजी शाळांसाठी सध्या पालकांना लाखांच्या घरात दरवर्षी खर्च लागतो. तर उच्च शिक्षणासाठी लागणा-या खर्चाचीच तर बातच नको. पण तुमच्या या स्वप्नाला शैक्षणिक कर्जाचे (Education Loan) बळ मिळू शकते. विविध बँका (Banks) शैक्षणिक कर्ज देतात. एका कालावधीसाठी हे कर्ज असते. तुमचे शिक्षण पूर्ण झाल्यावर ठराविक काळात तुम्हाला त्याची व्याजासहित परतफेड करावी लागते. त्यामुळे संशोधनाची, अभ्यासाची संधी हुकवायची नसेल तर शैक्षणिक कर्जाचा पर्याय जोखून बघायला हरकत असण्याचे कारण नाही.

शैक्षणिक कर्ज मिळणे फारसे अवघड नाही. ते सहजरित्या मिळते. कर्ज घेण्यासाठीचे नियम आणि अटी सोप्या आहेत. भारतासह विदेशातील दर्जेदार महाविद्यालये, विद्यापीठात शिक्षणाचा हमरस्ता गाठण्यासाठी अनेक बँका शैक्षणिक कर्ज पुरवठा करतात. विशेष बाब म्हणजे या शैक्षणिक कर्जात तुमच्या शिक्षणासोबतच विदेशातील प्रवासाचा आणि राहण्याचा खर्च पूर्ण होतो. शैक्षणिक कर्ज देण्यासाठी बँकांची प्रक्रिया सुटसुटीत असते. त्यामुळे अर्ज केल्यानंतर आणि प्रक्रियेनंतर शैक्षणिक कर्ज मिळते. तसेच विद्यार्थ्यांना विलंब शुल्क अथवा इतर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत नाही. जर तुम्ही बँकेच्या अटी-शर्ती पूर्ण करत असाल तर शैक्षणिक कर्ज मिळणे सुलभ आहे. शैक्षणिक कर्जासाठी अगोदर अटी व शर्ती वाचा. तुम्ही https://www.bankbazaar.com/ या संकेतस्थळावर कर्जासाठीची तुमची पात्रता तपासू शकता.

हे सुद्धा वाचा

 1. या बँका देतात शैक्षणिक कर्ज
  चला तर जाणून घेऊयात, कोणत्या बँकांमध्ये स्वस्तात शैक्षणिक कर्ज उपलब्ध आहे ते, 20 लाख रुपयांच्या शैक्षणिक कर्जासाठी 7 वर्षांची परतफेड गृहित धरत कोणत्या बँकांचा किती हप्ता येईल ते बघुयात
 2. एसबीआयचे शैक्षणिक कर्ज
  स्टेट बँक ऑफ इंडियात सध्याच्या स्थितीत शैक्षणिक कर्जासाठी 6.70 टक्क्यांचे व्याज आकारण्यात येते. 20 लाख रुपयांच्या कर्जासाठी 29 हजार 893 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल
 3. बँक ऑफ बडोदा
  बँक ऑफ बडोदा बँकेच्या शैक्षणिक कर्जासाठी 6.75 टक्क्यांचे व्याज आकारल्या जाते. 20 लाख रुपयांच्या कर्जासाठी तुम्हाला 29,942 रुपयांचा हप्ता चुकता करावा लागेल.
 4. पंजाब नॅशनल बँक
  पीएनबी मध्ये शैक्षणिक कर्जासाठी 6.75 टक्के दराने व्याजासहित रक्कम चुकती करावी लागेल. 20 लाख रुपयांच्या कर्जासाठी 29, 942 रुपयांचा हप्ता द्यावा लागेल.
 5. आयडीबीआय बँक
  आयडीबीआय बँकेला शैक्षणिक कर्जासाठी 6.75 टक्के व्याज द्यावे लागेल. त्यासाठी कर्जदाराला 29 हजार 942 रुपयांचा हप्ता जमा करावा लागेल.
 6. युनियन बँक
  युनियन बँकेच्या शैक्षणिक कर्जाचा व्याज दर 6.80 टक्के आहे. या बँकेच्या कर्जदाराला 29,990 रुपयांचा हप्ता चुकता करावा लागेल.


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें