“नापास झाले तर माझं लग्न मोडेल, मला पास करा मी तुमच्या मुलीसारखी”, बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांची भन्नाट उत्तर

इंटरमिजिएटच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिकेत काय लिहिलय हे वाचून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही. Bihar board exam students funny statements

नापास झाले तर माझं लग्न मोडेल, मला पास करा मी तुमच्या मुलीसारखी, बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांची भन्नाट उत्तर
बिहार बोर्ड परीक्षेतील भन्नाट उत्तरे
Yuvraj Jadhav

|

Mar 21, 2021 | 11:49 AM

पाटणा: बिहार बोर्ड परीक्षा (Bihar Board Exam)देशातील सर्वात जलदगतीनं घेतली जाणारी बोर्ड परीक्षा आहे. बोर्ड परीक्षेचे निकाल(Bihar Board Exam Result) लवकरच जाहीर केले जातील. परीक्षेतील कॉपी आणि गैरव्यवहार रोखण्यासाठी बोर्डाकडून भरारी पथकं तयार करण्यात आली आहेत. इंटरमिजिएटच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिकेत काय लिहिलय हे वाचून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही. काही विद्यार्थिनींनी मी तुमच्या मुलीसारखी आहे पास करा. लग्न होणार नाही पास करा तर काही जणांनी हनुमानाची भक्ती करण्यासाठी सुट्टी मागितली आहे. (Bihar board exam students funny statements on answer book)

भरारी पथकाच्या निदर्शनास आलेला प्रकार

बिहारच्या बोर्ड परीक्षेमध्ये (Bihar Board Exam)भरारी पथकाला तपासणी करताना उत्तरपत्रिकेवर लिहिलेला मजेशीर मजकूर पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांनी लिहीलेली उत्तर पाहून भरारी पथकाचे कर्मचारी देखील चक्रावले. ज्या विद्यार्थ्यांना प्रश्नांची योग्य उत्तर लिहिता येत नाहीत त्यांनी भन्नाट उत्तर लिहिलेली दिसून आली.

लग्न मोडेल पास करा

एका विद्यार्थिनीनं लग्न मोडण्याची भीती व्यक्त करत पास करण्याची मागणी केली. त्या विद्यार्थिनीनं लग्न 26 मे रोजी असून नापास झाल्यास लग्न मोडलं जाईल. मी तुमच्या मुलीसारखी आहे. लग्न मोडून नये म्हणून पास करा, मोठे उपकार होतील, असं उत्तरात म्हटलं आहे.

हनुमानाची भक्ती करायचीय सुट्टी द्या

परीक्षेत भक्ती चळवळीविषयी प्रश्न विचारला असता एका विद्यार्थ्यानं भलतंच उत्तर दिलं आहे. त्यानं महाशय, सविनय निवेदन मी बजरंगबलीचा भक्त आहे. मला हनुमानाची भक्ती करण्यासाठी 5 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारीदरम्यान सुट्टी द्या, असं म्हटलं आहे. मला परीक्षेत पास करा तुमच्या चरणात लीन होईन, असं एका विद्यार्थ्यानं लिहिलं आहे.

कोरोनाचंही कारण

कोरोना संसर्ग असून देखील बिहारमध्ये बोर्ड परीक्षा सुरु आहेत. लवकरच परीक्षांचा निकाल जाहीर होईल. एका विद्यार्थ्यानं उत्तरामध्ये कोरोना संसर्ग झाल्यामुळे अभ्यास करता आला नाही. त्यामुळे अभ्यास कमी झालाय, पास करा अशी विनंती केली आहे. काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत मोबाईल नंबर देखील लिहीले आहेत.

सबंधित बातम्या :

ठाकरे सरकार बिल्डरधार्जिणे म्हणणाऱ्या भाजपला काँग्रेसचं जोरदार प्रत्युत्तर

Maharashtra Board Exam and Result Date 2021 : 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा ‘या’ दिवशी होणार

CBSE board exam 2021 schedule : 10 वी आणि 12 वीच्या वेळापत्रकाची घोषणा 2 फेब्रुवारीला : रमेश पोखरियाल निशंक

Bihar board exam students funny statements on answer book

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें