CBSE 10th 12th Result 2022: सीबीएसई 10वी 12वी निकालाबाबत मोठी बातमी! निकाल वेळेत लागणार

CBSE 10th 12th Result 2022: परीक्षेचा निकाल बोर्डाकडून वेळेत जाहीर केला जाईल. याबाबत बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी बोलणे झाल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निकाल देण्यास विलंब होणार नाही.

CBSE 10th 12th Result 2022: सीबीएसई 10वी 12वी निकालाबाबत मोठी बातमी! निकाल वेळेत लागणार
CBSE 10th 12th Results 2022Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 19, 2022 | 7:10 AM

CBSE 10th 12th Result 2022: सीबीएसई 10th आणि 12th परीक्षेच्या निकालाबाबत मोठी बातमी आहे. सीबीएसईच्या दहावी-बारावीच्या निकालाचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी संकेत दिले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की, बोर्डाच्या परीक्षा (CBSE Board Result) 15 जून रोजी संपल्या आहेत, त्यानंतर कॉपी तपासून निकाल तयार करण्यासाठी 45 दिवस लागतील. ते पुढे म्हणाले की, परीक्षेचा निकाल बोर्डाकडून वेळेत जाहीर केला जाईल. याबाबत बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी बोलणे झाल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निकाल देण्यास विलंब होणार नाही. दहावी-बारावीचा निकाल (10th 12th Results) बोर्ड वेळेत जाहीर करेल.

26 जुलै आणि 28 जुलै- निकाल लागण्याची शक्यता

शिक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यानुसार या महिन्याअखेरीसच या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. मात्र अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार दहावीचा निकाल 26 जुलै आणि बारावीचा निकाल 28 जुलै रोजी लावता येणार आहे. सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा 26 एप्रिल 2022 पासून सुरू झाल्या. दहावीची परीक्षा 24 मे 2022 पर्यंत घेण्यात आली होती. बारावीची परीक्षा 15 जून 2022 पर्यंत घेण्यात आली होती. यंदा सुमारे 35 लाख विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीची परीक्षा दिली होती.

सीबीएसई दहावी-बारावीचा निकाल 2022

  • प्रथम सीबीएसई (CBSE)  www.cbse.gov.in अधिकृत संकेतस्थळाला (Official Website) भेट द्यावी.
  • यानंतर होम पेजवर दिलेल्या “सीबीएसई दहावी बारावी निकाल 2022” या लिंकवर क्लिक करा.
  • आता आपला रोल नंबर आणि जन्मतारीख प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
  • तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
  • तुम्ही तुमचा निकाल डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून ती तुमच्याकडेच ठेवावी
Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.