CBSE 10th Result 2021: सीबीएसई बोर्डाचं दहावीच्या निकालाचं काम पूर्ण, लवकरच निकाल जाहीर होण्याची शक्यता

CBSE Board 10th Result 2021: सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या निकालाची प्रतीक्षा आता संपणार आहे. सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

CBSE 10th Result 2021: सीबीएसई बोर्डाचं दहावीच्या निकालाचं काम पूर्ण, लवकरच निकाल जाहीर होण्याची शक्यता
सीबीएसई

CBSE 10th Result 2021 नवी दिल्ली: सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या निकालाची प्रतीक्षा आता संपणार आहे. सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे.केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तो तपासू शकतील. यावेळी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर सीबीएसईनं निकालाचं सूत्र निश्चित केलं होतं.

निकाल उद्या जाहीर होण्याचा अंदाज

सीबीएसई 10 वीचा निकाल 2021 उद्या जाहीर करेल असा अंदाज आहे. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार सीबीएसई बोर्डाकडून दहावीचा निकाल 20 जुलै पर्यंत जाहीर होणं अपेक्षित आहे. मात्र, मंडळाकडून अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही किंवा त्यासंदर्भात पुष्टी केली गेलेली नाही. यामुळे विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्डाच्या 10 वीच्या निकालाच्या माहितीसाठी सीबीएसईच्या निकालाच्या पोर्टलला भेट द्यावी. या आठवड्यात कधीही दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

दहावीचा निकाल कसा जाहीर होणार?

सीबीएसईंनं तयार केलेल्या 20+80 या फॉर्म्यल्यानुसार दहावीचा निकाल जाहीर होई.ल प्रत्येक विषयामध्ये विद्यार्थ्यांचे 100 गुणांचा मूल्यांकन केले जाईल. या मधील 20 गुण पहिल्या पद्धतीप्रमाणे अंतर्गत मूल्यमापनावर दिले जातील. तर 80 गुण नव्या धोरणानुसार दिले जातील. यामध्ये 10 गुण युनिट टेस्ट, 30 गुण सत्रांत परीक्षा तर 20 गुण पूर्वपरीक्षेला दिले जातील.

निकालावर समाधानी नसणाऱ्यांसाठी ऑगस्टमध्ये परीक्षा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांमधून मुल्याकन पद्धतीवर अनेक प्रश्न विचारले जात होते. त्याला उत्तर देताना केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी मोठी घोषणा केलीय. ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता 10 वी आणि 12 वीचा निकाल मान्य नसेल, त्या निकालावर समाधान नसेल त्यांच्यासाठी कोरोनाची परिस्थिती पाहून ऑगस्टमध्ये लेखी परीक्षा घेण्याची घोषणा त्यांनी केली. त्यामुळे लेखी परीक्षा देण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे

इतर बातम्या:

CBSE Exam : सीबीएसईचा मोठा निर्णय, 10 वी आणि 12 वीची वर्षातून दोनवेळा परीक्षा होणार

CBSE 10th Result 2021: सीबीएसईचा निकाल अंतिम टप्प्यात, काहीच दिवसांत निकाल जाहीर होणार

CBSE Board 10th Result 2021 to be Declared Soon know details how result prepared

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI