CBSE Date Sheet 2021: सीबीएसईकडून मायनर विषयांची डेटशीट जाहीर, दहावी बारावीच्या टर्म 1 परीक्षेची घोषणा

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सीबीएसईनं दहावी बारावीच्या परीक्षा दोन सत्रात आयोजित करण्याचा नि्रणय घेतला आहे. त्यानुसार सीबीएसईकडून दहावी बारावीच्या टर्म 1 च्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. आज केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 10 वी, 12 मायनर विषयांची डेटशीट जारी केली आहे.

CBSE Date Sheet 2021: सीबीएसईकडून मायनर विषयांची डेटशीट जाहीर, दहावी बारावीच्या टर्म 1 परीक्षेची घोषणा
CBSE
Follow us
| Updated on: Oct 21, 2021 | 6:16 PM

नवी दिल्ली: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सीबीएसईनं दहावी बारावीच्या परीक्षा दोन सत्रात आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सीबीएसईकडून दहावी बारावीच्या टर्म 1 च्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. आज केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 10 वी, 12 मायनर विषयांची डेटशीट जारी केली आहे. इयत्ता 10 वी आणि 12 वी दोन्हीसाठी मायनर विषयांची डेटशीट cbse.nic.in या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. इयत्ता 10 टर्म I मायनर विषय परीक्षा 17 नोव्हेंबर रोजी पेंटिंग पेपरसह सुरू होईल आणि 7 डिसेंबर रोजी अरबी, तिबेटी, फ्रेंच, जर्मन, रशियन, फारसी, नेपाळी, लिंबू, लेपचा आणि कर्नाटकी संगीताच्या पेपरसह समाप्त होईल. त्याचप्रमाणे, इयत्ता 12 वी टर्म I मायनर विषय परीक्षा 16 नोव्हेंबर रोजी उद्योजकता आणि सौंदर्य आणि निरोगीपणाच्या पेपरांसह सुरू होईल आणि 30 डिसेंबर रोजी कृषी आणि मास मीडिया स्टडीजसह समाप्त होईल.

परीक्षा कधी होणार

इयत्ता 10 मायनर विषय परीक्षांबरोबरच, 12 वीच्या मुख्य विषयांची परीक्षा देखील घेतली जाईल आणि 12 वीची मायनर विषयांची परीक्षा तसेच वर्ग 10 ची मुख्य विषयाची परीक्षा घेतली जाईल. नोटीसनुसार, हिवाळ्यातील थंडीचे दिवस लक्षात घेऊन, 10 वी, 12 वीची परीक्षा सकाळी 10.30 ऐवजी सकाळी 11.30 वाजता सुरू होईल आणि वाचनाची वेळ 15 मिनिटांऐवजी 20 मिनिटे असेल.

 10 वी मायनर परीक्षा डेटशीट

चित्रकला : 17 नोव्हेंबर 2021 गुरुंग, तमांग, थाई इत्यादी – 18 नोव्हेंबर 2021 उर्दू, पंजाबी, बंगाली इत्यादी – 20 नोव्हेंबर 2021 संस्कृत – 22 नोव्हेंबर, 2021

 12 मायनर परीक्षा डेटशीट

उद्योजकता – 16 नोव्हेंबर 2021 टेक्सटाईल डिझाईन – 17 नोव्हेंबर 2021 मार्केटिंग – 18 नोव्हेंबर 2021 फॅशन स्टडीज – 22 नोव्हेंबर 2021

विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याची संधी देईल

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने टर्म 1 परीक्षेची डेटशीट नुकतीच जारी केली आहे. आता सीबीएसईने विद्यार्थ्यांना नोटीसद्वारे परीक्षा केंद्र बदलण्याची परवानगी देण्यात आल्याचं सांगितलं आहे. बोर्डाच्या निदर्शनास आल्यानुसार अनेक विद्यार्थी त्यांची शाळा आहे त्या ठिकाणी नाहीत, अशा स्थितीत परीक्षेचे शहर बदलण्याची सुविधा विद्यार्थ्यांना दिली जाईल. सीबीएसईनं विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेशी कधी संपर्क साधू शकतात आणि परीक्षा केंद्र बदलण्याची विनंती करू शकतात यांसदर्भात सविस्तर माहिती देणार आहे.

इतर बातम्या:

पुण्याच्या जिल्हा परिषद शाळेची भरारी, रोबोटिक्स शिक्षणातून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व्यापक लसीकरण मोहीम

CBSE Date Sheet 2021 for Class 10 and 12 minor subjects released Check time table here of term 1 exam

Non Stop LIVE Update
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.