सीबीएसईचं विद्यार्थ्यांसाठी मोठं पाऊल, 9 वी ते 12 वीसाठी नवं ॲप लाँच

सीबीएसई बोर्डानं विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी नवीन ॲप लाँच केलं आहे. CBSE Dost For Life App

सीबीएसईचं विद्यार्थ्यांसाठी मोठं पाऊल, 9 वी ते 12 वीसाठी नवं ॲप लाँच
सीबीएसईचं नव ॲप लाँच

नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डानं विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी नवीन अ‌ॅप लाँच केलं आहे. सीबीएसईकडून सुरु करण्यात आलेल्या अ‌ॅपचं नाव ‘सीबीएसई दोस्त फॉर लाईफ’(CBSE Dost for Life APP ) आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळं परीक्षा रद्द झाल्यानं विद्यार्थ्यांवर मानसिक दडपण आलेलं आहे. हे दडपण कमी करण्यासोबत विद्यार्थ्यांचं समुपदेशन करण्यासाठी सीबीएसईकडून हे अ‌ॅप सुरु करण्यात आलेय. नवीन फीचरसह हे अ‌ॅप 10 मेपासून सुरु होणार आहे. अ‌ॅपचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पालकांचंही समुपदेशन करण्यात येणार आहे. (CBSE Launch CBSE Dost For Life App for students parents to take psychosocial well being during corona)

नव्या अ‌ॅपमध्ये काय मिळणार?

सीबीएसई दोस्त फॉर लाईफ या अ‌ॅपद्वारे विद्यार्ध्यांना एका आठवड्यात तीन दिवस प्राचार्य आणि समुपदेशकांद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तीन दिवसांमध्ये मार्गदर्शन सत्र आयोजित केली जाणार आहेत. यामध्ये 83 स्वयंसेवक सहभागी होतील. यामध्ये 66 भारतातून, 17 सौदी अरेबियातून, युएई, नेपाळ, ओमान, कुवैत, जपान आणि अमेरिकेतून ते सहभागी होतील.

दोन सत्रात समुपदेश

सीबीएसई दोस्त फॉर लाईफ अ‌ॅपमध्ये विद्यार्थी पालक यांचं समुपदेशन करण्यासाठी दोन सत्रांची वेळ निश्चित करण्यातल आली आहे. यामध्ये चॅट बॉक्स 9.330-1.30 आणि 1.30 ते 5.30 या काळासाठी सक्रिय असेल. याशिवाय 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी कोर्स मार्गदर्शक, मानसिक आरोग्यासंबंधी मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय अ‌ॅपमध्ये कोरोना संदर्भात काळजी कशी घ्यावी, याचं देखील मार्गदर्शन केलं जाणार आहे. हे अ‌ॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.

अ‌ॅप कसं इन्स्टॉल करणार?

हे अ‌ॅप तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल करायचं असेल तर तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करावं लागेल. अ‌ॅपमध्ये ऑडियो आणि व्हिडीओ देखील उपलब्ध आहेत. अ‌ॅपसंदर्भातील अधिक माहिती तुम्हाला सीबीएसई आणि यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध असेल. सीबीएसई दोस्त फॉर लाईफ अ‌ॅपमध्ये मानसिक तणाव कमी करण्यासंबंधीचे उपाय देखील सांगितले जाणार आहेत. विद्यार्थी त्यांचा मोबाईल नंबर आणि शाळेतील त्यांचा नोंदणी क्रमांक टाकून नोंदणी करु शकतात.

संबंधित बातम्या:

कोव्हिड लसीकरणातील Co- win ॲप आजपासून पुन्हा अ‌ॅक्टिव्ह, शुभारंभावेळीच अ‌ॅप झालं होतं डाऊन

Special Story | मुंबई महापालिकेच्या 10 शाळांमध्ये सीबीएसई बोर्ड, प्रवेश कधी आणि कसे मिळणार?

(CBSE Launch CBSE Dost For Life App for students parents to take psychosocial well being during corona)