CISCE Class 12 Exam 2021 | सीबीएसई नंतर आता ICSE बोर्डाचीही परीक्षा रद्द, आता निकालावर काम

केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर आता सीआयएससीई (CISCE) नेसुद्धा 12 बोर्डाची परीक्षा रद्द केली आहे.

CISCE Class 12 Exam 2021 | सीबीएसई नंतर आता ICSE बोर्डाचीही परीक्षा रद्द, आता निकालावर काम
exam
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 10:36 PM

CISCE Class 12 Exam 2021 Cancelled : केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर आता सीआयएससीई (CISCE) नेसुद्धा 12 बोर्डाची परीक्षा रद्द केली आहे. देशातील सध्याची कोरोनास्थिती आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता हा निर्णय घेण्याता आला. या निर्णयानंतर आता इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या निकालावर काम केले जाणार आहे. (CISCE class 12 exam 2021 cancelled now board will work on result after CBSE decision)

निकाल कसा तयार करणार ?, लवकरच निर्णय

काऊन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) बोर्डाने बारावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे. या निर्णयाबाबत  CISCE चे अध्यक्ष डॉ. जी. इमॅन्युएल (Dr G Immanuel) यांनी सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी ICSE बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना कोणत्या निकषांवर गुण द्यावेत तसेच त्यांचा निकाल कसा तयार करावा याबाबत निर्णय बाकी असल्याचं सांगितलं. विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यासाठीचे निकष तसेच गुणांकन पद्धती लवकरच ठरवली जाईल, असे इमॅन्युएल म्हणाले.

परीक्षेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींची बैठक

देशात कोरोनाची दुसरी लाट असल्यामुळे अशा बिकट परिस्थितीत इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे जिकरीचे ठरु शकते, असे मत अनेकांकडून व्यक्त केले जात होते. परीक्षा रद्द करण्यात याव्यात अशी मागणी अनेक विद्यार्थी तसेच पालक करत होते. याच पार्श्वभूमीवर आज (1 जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. या निर्णयानंतर आता CISCE नेसुद्धा 12 वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

इतर बातम्या :

CBSE Board 12 Exam cancelled: बारावीच्या परीक्षा रद्द, मोदी सरकारचा मोठा निर्णय

(CISCE class 12 exam 2021 cancelled now board will work on result after CBSE decision)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.