CLAT 2025: विधी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी समुपदेशन प्रक्रिया सुरू, जाणून घ्या

CLAT 2025 counselling: तुम्ही भावी वकील बनू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. क्लॅट 2025 समुपदेशन वेळापत्रक जाहीर झाले आहे. कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजनेही नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. तुम्ही क्लॅट 2025 परीक्षा देखील उत्तीर्ण केली असेल तर तुम्ही 20 डिसेंबर 2024 पर्यंत समुपदेशनासाठी नोंदणी करू शकता. पहिली अलॉटमेंट लिस्ट 26 डिसेंबरला जाहीर होणार आहे.

CLAT 2025: विधी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी समुपदेशन प्रक्रिया सुरू, जाणून घ्या
CLAT 2025 counsellingImage Credit source: Getty Images
Follow us
| Updated on: Jan 03, 2025 | 3:09 PM

CLAT 2025 counselling: विधी क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यींसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. क्लॅट 2025 समुपदेशन वेळापत्रक जाहीर झाले आहे. कॉमन लॉ अ‍ॅडमिशन टेस्ट उत्तीर्ण झालेले उमेदवार क्लॅट consortiumofnlus.ac.in च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन प्रवेशाच्या तारखा तपासू शकतात.

अधिकृत अधिसूचनेनुसार, नोंदणी प्रक्रिया 9 डिसेंबर पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2024 आहे, तर प्रवेशासाठी पहिली वाटप यादी 26 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता जाहीर केली जाईल.

नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजच्या कन्सोर्टियमकडून फ्रीज अँड फ्लोट ऑप्शन आणि प्रवेशासाठी 26 डिसेंबर ते 4 जानेवारी 2025 या कालावधीत पहिल्या अलॉटमेंट लिस्टसाठी कन्फर्मेशन फी भरता येणार आहे. उमेदवारांना NLU च्या कन्सोर्टियमच्या वेबसाईटवरील त्यांच्या क्लॅट खात्यात लॉगिन करावे लागेल आणि प्रत्येक फेरीदरम्यान त्यांना समुपदेशनासाठी बोलावले गेले आहे, याची पुष्टी करावी लागेल. कन्सोर्टियम कोणत्याही प्राप्त ईमेल / एसएमएससाठी जबाबदार राहणार नाही.

क्लॅट 2025 समुपदेशन नोंदणी कशी करावी?

  • सर्वप्रथम क्लॅट consortiumofnlus.ac.in च्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
  • त्यानंतर लॉगिन लिंकवर क्लिक करा आणि आवश्यक तपशील भरा.
  • त्यानंतर समुपदेशन फेरीसाठी नोंदणी करा.
  • त्यानंतर अर्ज भरून अर्ज शुल्क भरा.
  • आता सबमिट बटणावर क्लिक करा आणि कन्फर्मेशन पेज डाऊनलोड करा.
  • पुढील गरजेसाठी त्याची हार्ड कॉपी सोबत ठेवा.

क्लॅट 2025 समुपदेशन नोंदणी शुल्क किती?

सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी 30 हजार रुपये, तर एसटी/एससी/ओबीसी/बीसी/ईडब्ल्यूएस/पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 20 हजार रुपये नोंदणी शुल्क आहे. क्लॅट 2024 पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर कन्सोर्टियम वेबसाइटद्वारे शुल्क ऑनलाईन भरता येईल.

पहिली यादी कधी येणार?

नोंदणी प्रक्रिया 9 डिसेंबर पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2024 आहे, तर प्रवेशासाठी पहिली वाटप यादी 26 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता जाहीर केली जाईल.

उमेदवारांनी लक्षात घ्यावे, प्रवेश समुपदेशन प्रक्रियेची नोंदणी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या उमेदवारांचाच जागा वाटपासाठी विचार केला जाईल. उमेदवारांना NLU च्या कन्सोर्टियमच्या वेबसाईटवरील त्यांच्या क्लॅट खात्यात लॉगिन करावे लागेल आणि प्रत्येक फेरीदरम्यान त्यांना समुपदेशनासाठी बोलावले गेले आहे, याची पुष्टी करावी लागेल.

अधिक माहितीसाठी, उमेदवार कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजच्या अधिकृत वेबसाईट consortiumofnlus.ac.in. येथे भेट देऊ शकतात.

अखेर कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेला न्याय, नराधमाला जन्मठेप अन्
अखेर कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेला न्याय, नराधमाला जन्मठेप अन्.
सैफचा जीव वाचवणाऱ्या 'रियल लाइफ हिरो'ला मुंबईकरांचा असा सॅल्यूट
सैफचा जीव वाचवणाऱ्या 'रियल लाइफ हिरो'ला मुंबईकरांचा असा सॅल्यूट.
23 जानेवारीला राज्यात मोठा भूकंप होणार,शिवसेनेच्या बड्या नेत्याचा दावा
23 जानेवारीला राज्यात मोठा भूकंप होणार,शिवसेनेच्या बड्या नेत्याचा दावा.
'असं का ओरडला नाहीत?', मुंडेंच्या पहाटेच्या शपथविधीनंतर राऊतांचा सवाल
'असं का ओरडला नाहीत?', मुंडेंच्या पहाटेच्या शपथविधीनंतर राऊतांचा सवाल.
भाजपात येण्यासाठी काँग्रेसचा नेता फडणवीसांना भेटला? सामंतांचा दावा
भाजपात येण्यासाठी काँग्रेसचा नेता फडणवीसांना भेटला? सामंतांचा दावा.
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी अपडेट, कोर्टानं 5 पोलिसांनाच धरल जबाबदार
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी अपडेट, कोर्टानं 5 पोलिसांनाच धरल जबाबदार.
'हा बालिशपणा, मी भीक घालत नाही', सामंतांनी राऊत-वडेट्टीवारांना फटकारलं
'हा बालिशपणा, मी भीक घालत नाही', सामंतांनी राऊत-वडेट्टीवारांना फटकारलं.
बीडच्या पालकमंत्रीपदावरून पंकजा मुंडे म्हणाल्या, '..तर आंनद झाला असता'
बीडच्या पालकमंत्रीपदावरून पंकजा मुंडे म्हणाल्या, '..तर आंनद झाला असता'.
'शिंदे अस्वस्थ आत्मा, दरेवालाबाबा त्यांनी कुंभमेळ्यात..',राऊतांचा टोला
'शिंदे अस्वस्थ आत्मा, दरेवालाबाबा त्यांनी कुंभमेळ्यात..',राऊतांचा टोला.
"मला भिती वाटते माझं वक्तव्य मोठं...ठाकरेंना संपवून शिंदेंना आणलं आता"