CUET PG प्रवेश 2022 : आता पदवीनंतरच्या उच्च शिक्षणासाठी द्यावी लागेल CUET परीक्षा, वेबसाईट ओपन, आजच अर्ज करा!

CUET PG प्रवेश 2022 : आता पदवीनंतरच्या उच्च शिक्षणासाठी द्यावी लागेल CUET परीक्षा, वेबसाईट ओपन, आजच अर्ज करा!
अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशात मोठा बदल

कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षा : पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, ज्या विद्यार्थांना पोस्ट ग्रॅज्युएशनच्या प्रवेशासाठी कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (CUET-PG) चाचणी देखील द्यावी लागेल. अर्जाची प्रक्रिया आजपासून म्हणजेच १९ मेपासून सुरू झाली आहे.

आयेशा सय्यद

|

May 19, 2022 | 2:46 PM

मुंबई : काळानुरूप शिक्षण पद्धतीत बदल होत असतांनाच आता, पदवीनंतरचे उच्च शिक्षण घेण्यासाठीही प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे. UG नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनच्या प्रवेशासाठी (For PG admission)आता, कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षा (Entrance exam) देखील द्यावी लागेल. याबाबत यूजीसीचे अध्यक्ष एम. जगदेश कुमार यांनी ही माहिती दिली आहे. PG साठी CUET अर्ज आज म्हणजेच 19 मे रोजी NTA च्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केला जाईल. सेंट्रल युनिव्हर्सिटी (PG प्रवेश 2022) मधील पीजी कोर्समध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश घेऊ शकतात. परीक्षेबाबत यूजीसीचे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांनी सांगितले की, जुलैच्या पहिल्या आठवड्यात ही परीक्षा घेतली जाईल. दरम्यान, परीक्षेच्या तारखेबद्दल (About the exam date) अद्याप (CUET Exam Date 2022) स्पष्टपणे काहीही सांगितले नाही. UG CUET ची परीक्षाही जुलैच्या पहिल्या आठवड्यात घेतली जाईल. यूजीच्या परीक्षेची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र आता पीजीसाठी CUET जाहीर झाल्यानंतर दोन्ही परीक्षा एकाच वेळी घेतल्या जाण्याची शक्यता आहे.

CUET PG साठी अर्ज प्रसिद्ध

CUET PG च्या घोषणेनंतर, आता केंद्रीय विद्यापीठात PG प्रवेशासाठी (CUET PG 2022) CUET उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. लवकरच परीक्षेचा नमुना आणि सर्व माहिती NTA वेबसाइट nta.ac.in वर अपडेट केली जाईल.

UG CUET साठी नोंदणी प्रक्रिया सुरू

अर्ज प्रसिद्ध झाल्यानंतर, उमेदवारांना अर्ज करावा लागेल. तथापि, CUET PG साठी अंतिम तारीख जाहीर केलेली नाही. सर्व अपडेट संकेतस्थळावरच उपलब्ध करून दिली जातील.

CUET PG परीक्षा पॅटर्न

CUET UG चा परीक्षा पॅटर्न आधीच प्रसिद्ध झाला आहे. परीक्षा पद्धतीनुसार, परीक्षा 13 भाषांमध्ये घेतली जाईल. CUET PG साठी अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण हाच पॅटर्न पीजीसाठी वापरला जाईल, अशी अट आहे. मात्र यासाठी अधिकृत घोषणाहोणे आवश्यक आहे.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें