केंद्र सरकार संपूर्ण देशाचं आहे की एका बोर्डाचं? : हेरंब कुलकर्णी

देशातील सर्व परीक्षांसाठी न घेता केवळ सीबीएसई परीक्षांपुरताच घेतल्यानं शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी केंद्र सरकार संपूर्ण देशाचं आहे की एका बोर्डाचं असा गंभीर प्रश्न विचारला आहे.

केंद्र सरकार संपूर्ण देशाचं आहे की एका बोर्डाचं? : हेरंब कुलकर्णी


अहमदनगर : केंद्रातील मोदी सरकारने आज (1 जून) देशभरातील सीबीएसई बोर्डाच्या 12 वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय देशातील सर्व परीक्षांसाठी न घेता केवळ सीबीएसई परीक्षांपुरताच घेतल्यानं शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केंद्र सरकार संपूर्ण देशाचं आहे की एका बोर्डाचं असा गंभीर प्रश्न विचारला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका छोट्या बोर्डासाठी बैठक घेऊन निर्णय घेण्याऐवजी अशी बैठक देशभरातील धोरण ठरवण्यासाठी घ्यावी, अशीही मागणी हेरंब कुलकर्णी यांनी केली (Educationist Heramb Kulkarni question Modi Government decision on only 12th CBSE board exam).

हेरंब कुलकर्णी म्हणाले, “सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांबद्दलचा (CBSE board exam) केंद्र सरकारचा निर्णय नक्कीच महत्त्वाचा आहे. परंतु केंद्र सरकार हे केवळ एका बोर्डापुरतं आहे का असा प्रश्न पडतो. साथी रोगाच्या काळात सर्वच निर्णय केंद्र सरकारने संपूर्ण देशासाठी घ्यायला हवेत. मग सरकार एका बोर्डासाठी निर्णय का घेत आहे?”

“एका छोट्या बोर्डासाठी पंतप्रधान, संरक्षण मंत्री बैठक घेतात, त्यांनी देशासाठी निर्णय घ्यावा”

“सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेला एकूण 11 लाख 92 हजार मुलं बसलेत. दुसरीकडे महाराष्ट्रात एकट्या बारावीची 15 लाख मुलं परीक्षेला बसलेली आहेत. त्यामुळे एका छोट्या बोर्डासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एकत्रित येऊन निर्णय घेतात तो संपूर्ण देशासाठी घ्यायला हवा,” अशी मागणी त्यांनी केली.

“राज्यांच्या कोर्टात बॉल टाकायचा आणि राज्यांनी त्यांचे वेगवेगळे निर्णय घ्यायचे असं कसं चालेल?”

“राज्यांच्या कोर्टात बॉल टाकायचा आणि राज्यांनी त्यांचे वेगवेगळे निर्णय घ्यायचे असं कसं चालेल? याचं कारण असं की आता देशासमोर ज्या स्पर्धापरीक्षा उभ्या ठाकल्या आहेत त्याविषयी शासन काय धोरण घेणार आहे? हेही घोषित करायला पाहिजे. कारण तिथं एकाएका मार्काची लढाई आहे. त्यामुळे तिथं थोडंफार इकडं तिकडं झालं तर पालक पुन्हा कोर्टात जाणार आणि त्यातून विद्यार्थ्यांचं भविष्य पुन्हा कोर्टात जाऊन टांगणीला लागणार का? असा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो,” असंही मत हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केलं.

तसेच 3 जूनला पुन्हा सर्वोच्च न्यायालयात याची सुनावणी आहे. तो निर्णय काय येईल तो पुन्हा वेगळाच असेल. म्हणूनच येथून पुढचे शिक्षणाबद्दलचे सर्व निर्णय हे केंद्र सरकारने सर्व देशासाठी घेतले पाहिजे,” अशी मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा :

CBSE Board 12 Exam cancelled: बारावीच्या परीक्षा रद्द, मोदी सरकारचा मोठा निर्णय

CBSE चा दहावीच्या निकालाविषयी मोठा निर्णय, अंतर्गत मूल्यमापनाचे गुण सादर करण्याबाबत महत्वाचे आदेश जारी

12 वीच्या परीक्षेवर काय निर्णय घेणार? मुख्यमंत्री ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे ‘ही’ मागणी

व्हिडीओ पाहा :

Educationist Heramb Kulkarni question Modi Government decision on only 12th CBSE board exam