JEE Mains 2021 Registration : जेईई मेन्सच्या चौथ्या सत्रासाठी नोंदणीची तारीख वाढवली, परीक्षेच्या तारखेतही बदल

नोंदणीची मुदत 20 जुलै, 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. सोबत परीक्षेची तारीखदेखील वाढवण्यात आली आहे. जेईई 2021 सत्र-4 आता 26, 27 व 31 ऑगस्ट तसेच 1 आणि 2 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित केली जाणार आहे.

JEE Mains 2021 Registration : जेईई मेन्सच्या चौथ्या सत्रासाठी नोंदणीची तारीख वाढवली, परीक्षेच्या तारखेतही बदल
जेईई मेन्सची अंतिम उत्तर की जारी, येथे करा डाउनलोड

JEE Mains 2021 Registration नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency, NTA) संयुक्त प्रवेश परीक्षेच्या (JEE Main 2021) मे महिन्याच्या सत्रासाठी नोंदणीची शेवटची तारीख वाढविण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याबाबत ट्वीट केले आहे. नोंदणीची मुदत 20 जुलै, 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. सोबत परीक्षेची तारीखदेखील वाढवण्यात आली आहे. जेईई 2021 सत्र-4 आता 26, 27 व 31 ऑगस्ट तसेच 1 आणि 2 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित केली जाणार आहे. एकूण 7.32 लाख उमेदवारांनी आधीच जेईई (मुख्य) 2021 सत्र-4 साठी नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीवर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) जेईई मेन सेशन 4 च्या तारखांमध्ये पुन्हा बदल केला आहे.

विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार जेईई मेन तिसरे सत्र (जेईई सत्र 3) आणि चौथी सत्र परीक्षा (जेईई सेशन 4 परीक्षेची तारीख) दरम्यानच्या काळात कमीत कमी 4 आठवड्याचा (जवळपास एक महिना) गॅप आहे. म्हणून ही परीक्षा आता ऑगस्ट 2021 मध्ये आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी मागणी केली होती की, जेईई मेनच्या तिसऱ्या (JEE Session 3) आणि चौथ्या सत्र परीक्षेदरम्यान (JEE Session 4 exam Date) कमीत कमी 4 आठवड्यांचा (जवळपास एक महिना) गॅप आहे. ही परीक्षा आता ऑगस्ट 2021 मध्ये आयोजित केली जाणार आहे.

अ‍ॅडमिट कार्ड जारी

एनटीए जेईई मेन एप्रिल 2021 (JEE Main April 2021) अर्थात जेईई मेन परीक्षेच्या तिसऱ्या सत्रासाठी (JEE Main 3rd session) अ‍ॅडमिट कार्ड जारी केले आहे. ही परीक्षा 20 जुलैपासून सुरु होणार आहे. 20, 22, 25 आणि 27 जुलै 2021 रोजी देश-विदेशातील 334 शहरांमध्ये ऑनलाईन पद्धतीने या परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहे. जर अ‍ॅडमिट कार्ड डाउनलोड करताना उमेदवारांना कोणत्याही प्रकारची अडचण आली तर संबंधित उमेदवार 01140759000 वर संपर्क साधू शकतात. जेईई मेन्स सत्र परीक्षा ऑगस्टमध्ये होणार आहे. या परीक्षेच्या अ‍ॅडमिट कार्डसाठी स्वतंत्रपणे सूचना जेरी केली जाणार आहे.

असा करा अर्ज

– यामध्ये अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम एनटीएची अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic वर जा.
– होम पेजवर उपलब्ध जेईई मेन परीक्षा 2021 दुव्यावर क्लिक करा.
– नवीन पृष्ठ उघडेल की मागितलेली माहिती प्रविष्ट करा.
– आता अर्ज भरून अर्ज फी जमा करा.
– अर्ज भरा आणि डाउनलोड करा.

कोविड -19 मार्गदर्शक तत्त्वे जारी

एनटीएने नोटीस बजावत सांगितले आहे की, कोविड -19 मार्गदर्शक सूचनांसह संपूर्ण परीक्षा केंद्रांमध्ये पूर्णपणे पाळले जातील. प्रत्येक विद्यार्थ्याला नवीन मास्क दिला जाईल. सर्व परीक्षा केंद्रे एकाच वेळी गेटवर जमू नयेत म्हणून त्यांना वेगवेगळ्या रिपोर्टिंगची वेळ देण्यात येईल. ज्या कॉम्प्युटरवर उमेदवार परीक्षा देईल त्याचा उपयोग पुढील शिफ्टमध्ये होणार नाही. देश-विदेशातील 334 शहरांमध्ये स्थापन केलेल्या विविध केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. (Extended the registration date for the fourth session of JEE Mains, changed the exam date)

इतर बातम्या

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत, राज्यांना अधिकार मिळणार?

Q1FY22 Infosys Result: इन्फोसिसला 5200 कोटींचा नफा; थेट 35 हजार जणांना नोकर्‍या देणार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI