Maharashtra Board HSC Result : अवघ्या काही तासांत 12 वीचा निकाल, ‘या’ सोप्या स्टेप्समध्ये पाहा तुमचा रिझल्ट!

Maharashtra Board HSC Result 2025 News Marathi : 5 मे रोजी निकाल लागणार असल्याचे समजले असले तरी तो कसा पाहावा? निकालाची प्रत कशी डाऊनलोड करावी? हे अनेकांना समजलेले नाही.

Maharashtra Board HSC Result : अवघ्या काही तासांत 12 वीचा निकाल, या सोप्या स्टेप्समध्ये पाहा तुमचा रिझल्ट!
hsc result 2025
| Updated on: May 04, 2025 | 3:53 PM

HSC Exam 2025 Result : इयत्ता बारावीच्या परीक्षा होऊन बरेच दिवस झाले आहेत. आता सर्वच विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकतेच महत्त्वाची माहिती दिली आहे. या माहितीनुसार इयत्ता बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर केला जाणार आहे. 5 मे रोजी निकाल लागणार असल्याचे समजले असले तरी तो कसा पाहावा? निकालाची प्रत कशी डाऊनलोड करावी? हे अनेकांना समजलेले नाही. याच सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या…

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळानुसार इयत्ता बारावीचा फेब्रुवारी-मार्च 2025 चा निकाल 5 मे रोजी लागणार आहे. दुपारी 1 वाजता लागणार आहे. शिक्षण मंडळाने निकाल पाहण्यासाठी काही संकेतस्थळे दिलेली आहेत.

 

शिक्षण मंडळाने नेमके काय सांगितले? (How to download HSC Result)

मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांत ही परीक्षा घेण्यात आली होती. हा निकाल सोमवारी दिनाक 5 मे 2025 रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना कोणत्या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल?

https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams

https://results.digilocker.gov.in

https://mahahsscboard.in

http://hscresult.mkcl.org

निकाल कसा पाहावा. (How to check HSC Result)

वर नमूद केलेल्या कोणत्याही एक संकेतस्थळावर क्लिक करावे. त्यानंतर View HSC Result या ऑप्शनवर क्लिक करावे. त्यानंतर त्यांनी विचारलेली माहिती टाकून तुमचा निकाल पाहावा. तसेच पुढील शिक्षणाच्या प्रवेशासाठी या निकालाची प्रत डाऊनलोड करून घ्यावी.