AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

HSC Exam: विद्यार्थ्यांनी घेतलेल्या विषयाऐवजी दुसराच विषय, बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर बोर्डाचा गोंधळ, पालक-विद्यार्थ्यांचा संताप

Maharashtra Board Exam 2025: महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळाले आहेत. परंतु परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांनी घेतलेल्या विषयांपेक्षा वेगळे विषय आल्याने पालकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

HSC Exam: विद्यार्थ्यांनी घेतलेल्या विषयाऐवजी दुसराच विषय, बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर बोर्डाचा गोंधळ, पालक-विद्यार्थ्यांचा संताप
hsc exam
| Updated on: Feb 08, 2025 | 9:17 PM
Share

Maharashtra Board Exam 2025: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यंदा राज्यात परीक्षार्थींची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ३५ हजारांनी वाढली आहे. दहावीच्या परीक्षार्थींच्या संख्येत १९ हजारांनी तर बारावीच्या परीक्षार्थींच्या संख्येत १७ हजारांनी वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉल तिकीट मिळाले आहे. परंतु आता या हॉल तिकिटांवरील गोंधळ समोर आला आहे. विद्यार्थ्यांनी घेतलेला विषय हॉल तिकिटावर आला नाही. त्याऐवजी दुसराच विषय हॉल तिकिटावर आलेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ होत आहे. यासंदर्भात कोल्हापूरमधील पालक महाविद्यालयात पोहचले असून प्रशासनाला जाब विचारत आहे.

महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळाले आहेत. परंतु परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांनी घेतलेल्या विषयांपेक्षा वेगळे विषय आल्याने पालकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. कोल्हापुरातील पालक विमला गोयंका महाविद्यालयात पोहचले आहेत. पालकांनी यासंदर्भात प्रशासनाला जाब विचारला आहे. एकाच वेळी महाविद्यालयात मोठ्या संख्येने पालक जमा झाल्याने गोंधळ उडाला आहे.

शिकला एक विषय आला दुसरा विषय

विद्यार्थी बारावीत जो विषय शिकले. ज्या विषयाचा अभ्यास केला, तो विषय हॉल तिकिटावर दिलेला नाही. वर्षभर दुसऱ्या विषयाचा अभ्यास करून हॉल तिकिटावर वेगळेच विषय आल्याने विद्यार्थी धास्तावले आहेत. परीक्षेच्या तोंडावर हॉल तिकिटांवर झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी पालक अन् विद्यार्थ्यांचा गोंधळ उडणार आहे.

हॉल तिकीट असे करा डाऊलोड

  • mahahsscboard च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • Hall Ticket सेक्शनमध्ये जा.
  • रजिस्ट्रेशन डिटेल्ससह आवश्यक क्रेडेन्शियल्स एंटर करा.
  • एचएससी २०२५ परीक्षेसाठी परीक्षेसाठी प्रवेशपत्र (हॉल तिकीट) डाउनलोड करा.
  • हॉल तिकिटाची प्रिंट घ्या आणि त्यावर मुख्याध्यापकांची सही व शाळेचा स्टॅम्प घ्या.

कॉपीमुक्तीसाठी प्रशासन सज्ज

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासह मुक्त वातावरणात परीक्षा होण्याच्या दृष्टीने व परीक्षेदरम्यान कॉपीला आळा बसावा यासाठी कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचा निर्धार प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. दहावी व बारावीच्या परीक्षा भयमुक्त वातावरणात होतील याची केंद्र संचालकांनी काळजी घ्यावी याबद्दल देखील सूचना देण्यात आल्या. परीक्षा दरम्यान 500 मीटर परिसरातील झेरॉक्स दुकाने बंद राहण्याचे आदेश दिले आहे. नियमांची उल्लंघन केल्यास संबंधित झेरॉक्स दुकानदारांना सहआरोपी करण्याचे निर्देश देखील यावेळी देण्यात आले.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.