AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IIT : देशातील जातीवादाची दरी होणार दूर; आयआयटी बॉम्बेकडून खास कोर्स तयार

लोकांमध्ये निर्माण झालेली जातीवादाची दरी दूर करण्यासाठी आता जातिव्यवस्था (Caste system) शिकवली जाणार आहे. आयआयटी बॉम्बे (IIT Bombay) यासंदर्भात एक कोर्स सुरू करणार आहे.

IIT : देशातील जातीवादाची दरी होणार दूर; आयआयटी बॉम्बेकडून खास कोर्स तयार
IIT-BombayImage Credit source: tv9
| Updated on: Jul 05, 2022 | 8:18 PM
Share

लोकांच्या मनात असलेली जातीवादाची दरी दूर करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच आयआयटी बॉम्बे (IIT) यासंदर्भात एक कोर्स सुरू करणार आहे. हा अभ्यासक्रम सुरू करण्यामागचा हेतू जातीबद्दल जागरुकता निर्माण करणे हा आहे. हा एक अनिवार्य अभ्यासक्रम असेल. एससी/एसटी सेलने घेतलेला हा पहिलाच पुढाकार आहे. असे केल्याने जातिभेद संपुष्टात येण्यास मदत होईल, असा विश्वास सेलला आहे. सर्वेक्षण आधारित शैक्षणिक अभ्यासक्रम (Academic curriculum) या अभ्यासक्रमाबाबत आयआयटी बॉम्बेने म्हटले आहे, की सेलकडून नुकतेच एक सर्वेक्षण करण्यात आले. जातीविभागणीमुळे विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते हे समजून घेणे हा त्यामागचा उद्देश होता. यासोबतच जातीय आणि वांशिक भेदभावावर एक शैक्षणिक अभ्यासक्रम तयार करण्यावर या सर्वेक्षणात (Survey) भर देण्यात आला आहे.

लिंग संवेदीकरण अभ्यासक्रमाच्या धर्तीवर सुरू करा

जातीवादाची पाळेमुळे सामान्य माणसापासून तर उच्च वर्गीयांत देखील खोलवर रुजली आहे. जात धर्म, रंग यावरून अजून देखील भेदभाव बघायला मिळत आहे. यासाठी देशभरात नेहमीच जातीवादाचा निषेध होत आला आहे. लोकांमध्ये निर्माण झालेली ही दरी दूर करण्यासाठी आता जातिव्यवस्था (Caste system) शिकवली जाणार आहे. आयआयटी बॉम्बे (IIT Bombay) यासंदर्भात एक कोर्स सुरू करणार आहे.  गेल्या वर्षी सुरू झालेल्या अनिवार्य लैंगिक संवेदना अभ्यासक्रमाच्या धर्तीवर हा जात जागृती अभ्यासक्रम तयार करण्यास सांगितले आहे. SAILमध्ये संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक भरत अडसूळ आणि इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक मधु एन बेलूर हे संयोजक आणि सह-संयोजक आहेत.

जातीवर आधारित टिप्पण्या दूर करण्यात मदत होईल

या अभ्यासक्रमाबाबत, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती सेलचे म्हणणे आहे की, यामुळे जातिभेदाशी संबंधित तक्रारी कमी होण्यास मदत होईल. यासोबतच जातीवर आधारित टिप्पण्यांवरही बंदी घालण्यात येईल आणि वातावरणात एकोपा निर्माण होईल. सेलने पहिल्यांदाच जातीच्या संदर्भात येणाऱ्या अडचणी आणि त्यामागची कारणे यावर खुली चर्चा आयोजित केली होती. यावेळी सभेत सुमारे 100 उपस्थितांनी आपली मते मांडली. ज्यामध्ये जागांच्या आरक्षणाबाबत विद्यार्थ्यांना टोमणे मारावे लागत असल्याचे समोर आले. आयआयटीच्या प्राध्यापकांचा असा विश्वास आहे की त्यांच्या जातींवरील नवीन अभ्यासक्रमामुळे जातींबद्दल चुकीची विचारसरणी असलेल्या लोकांमध्ये जागृती निर्माण होईल, ज्यामुळे समाजात चांगले वातावरण निर्माण होईल.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.