JEE Advanced 2021 : जेईई ॲडव्हान्सड परीक्षेसाठी नोंदणीची अखेरची संधी, अर्ज कुठे करायचा?

संयुक्त प्रवेश परीक्षा अ‌ॅडव्हान्सडसाठी नोंदणी करण्याचा अखेरचा दिवस 20 सप्टेंबर हा आहे. जेईई मेन्स परीक्षा उत्तीर्ण असणारे विद्यार्थी जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षेसाठी नोंदणी करू शकतात.

JEE Advanced 2021 : जेईई ॲडव्हान्सड परीक्षेसाठी नोंदणीची अखेरची संधी, अर्ज कुठे करायचा?
संग्रहित छायाचित्र.


JEE Advanced 2021 नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात आलेल्या जेईई मेनच्या चौथ्या सत्राचा निकाल 15 सप्टेंबर रोजी जाहीर झाल्यानंतर जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षेची नोंदणी सुरु झाली होती. संयुक्त प्रवेश परीक्षा अ‌ॅडव्हान्सडसाठी नोंदणी करण्याचा अखेरचा दिवस 20 सप्टेंबर हा आहे. जेईई मेन्स परीक्षा उत्तीर्ण असणारे विद्यार्थी जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षेसाठी नोंदणी करू शकतात. कोरोना विषाणू संसर्गामुळे या वर्षी जेईई मुख्य परीक्षा 2021 चार टप्प्यांत घेण्यात आली होती.

जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षेची जबाबदारी आयआयटी खरगपूर

जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षेची नोंदणी प्रक्रिया भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) खरगपूरद्वारे पूर्ण केली जाणार आहे. विद्यार्थी अधिकृत वेबसाइट- jeeadv.ac.in द्वारे अर्ज करू शकतात.

जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी नोंदणी कशी करावी?

विद्यार्थी खाली दिलेल्या सोप्या स्टेप्सच्या मदतीने परीक्षेसाठी नोंदणी करू शकतील.

स्टेप 1: सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर भेट द्या .

स्टेप 2: त्यानंतर वेबसाइटवर दिलेल्या अर्जाच्या Application Form लिंकवर क्लिक करा.

स्टेप 3: आता नवीन नोंदणीच्या (New Registration) लिंकवर क्लिक करा.

स्टेप 4: यानंतर तुमचे नाव, वडिलांचे नाव, मोबाईल, ईमेल आणि इतर माहिती भरून नोंदणी करा.

स्टेप 5: आता लॉगिन करा आणि आपला अर्ज भरा, फोटो अपलोड करा आणि स्वाक्षरी करा.

स्टेप 6: त्यानंतर अर्ज फी सबमिट करा.

स्टेप 7: सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जाची प्रिंट घ्या.

अडीच लाख विद्यार्थी सहभागी होतील

जेईई मेन 2021 परीक्षा उत्तीर्ण करणारे 2.5 लाख विद्यार्थी जेईई अ‌ॅडव्हान्सड 2021 परीक्षेसाठी पात्र असतील. देशातील आयआयटी संस्थातील प्रवेशासाठी ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे. ही परीक्षा 3 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहे. परीक्षेपासून निकालापर्यंतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

महत्वाच्या तारखा

नोंदणी प्रक्रिया सुरु : 15 सप्टेंबर 2021
नोंदणीची शेवटची तारीख : 20 सप्टेंबर 2021
प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची तारीख : 25 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2021
परीक्षेची तारीख : 3 ऑक्टोबर 2021

दोन सत्रात परीक्षा

जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. पहिली शिफ्ट पेपर एक साठी असेल जी सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत असेल. दुसऱ्या शिफ्टमध्ये पेपर दोन दुपारी 2.30 ते 5.30 या वेळेत घेण्यात येईल. अधिक माहितीसाठी संबंधित तपशीलांसाठी उमेदवार जेईई अ‌ॅडव्हान्सडच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

इतर बातम्या:

Jee Main Result 2021: जेईई मेन्स परीक्षा निकालात 2 मुलींची बाजी, दिल्लीची काव्या चोप्रा, तेलंगाणाच्या कोमा शरण्याला पहिली रँक

JEE Main Result 2021: जेईई मेनचा निकाल जाहीर, नंबर 1 रँकवर 18 जण, महाराष्ट्राचा एकमेव अथर्व अभिजीत तांबट टॉपमध्ये

JEE Advanced 2021 Registration Last Date Know how to Apply and important Notice of IIT Kharagpur

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI