AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

JEE Advanced Admit Card 2022: जेईई ॲडव्हान्स्डच्या महत्त्वाच्या तारखा! ॲडमिट कार्ड 23 ऑगस्टपर्यंत जाहीर होण्याची शक्यता!

सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत, तर दुपारच्या शिफ्टच्या परीक्षा दुपारी 2.30 ते 5.30 या वेळेत होणार आहेत. जेईई ॲडव्हान्स्डचा निकाल 11 सप्टेंबरपर्यंत जाहीर होऊ शकतो, असे मानले जात आहे.

JEE Advanced Admit Card 2022: जेईई ॲडव्हान्स्डच्या महत्त्वाच्या तारखा! ॲडमिट कार्ड 23 ऑगस्टपर्यंत जाहीर होण्याची शक्यता!
JEE Advanced 2022Image Credit source: Social Media
| Updated on: Aug 22, 2022 | 8:45 AM
Share

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई (IIT Bombay) जेईई ॲडव्हान्स्ड 2022 (JEE Advanced 2022) परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे. jeeadv.ac.in अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, जेईई ॲडव्हान्स्ड ॲडमिट कार्ड (JEE Advanced Admit Card) उद्या म्हणजेच 23 ऑगस्टपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. जेईई मेन 2022 ची परीक्षा बी.ई. आणि B.Tech पेपरमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाईल. आयआयटी मुंबई जेईई ॲडव्हान्स परीक्षा घेण्यासाठी सज्ज झाली आहे.

जेईई ॲडव्हान्स्डच्या महत्त्वाच्या तारखा

  1. जेईई ॲडव्हान्स्ड ॲडमिट कार्ड- 23 अगस्त 2022 (टेंटेटिव्ह)
  2. पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी पेपर रायटरची निवड- 27 ऑगस्ट 2022
  3. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख- 28 ऑगस्ट 2022
  4. जेईई ॲडव्हान्स्ड 2022 परीक्षेची तारीख- 28 ऑगस्ट 2022
  5. जेईई ॲडव्हान्स्ड रिस्पॉन्स शीट – 1 सप्टेंबर 2022
  6. प्रोव्हिजनल उत्तर की- 3 सप्टेंबर 2022
  7. उत्तर की आक्षेपाची शेवटची तारीख – 4 सप्टेंबर 2022
  8. अंतिम उत्तर की- 11 सप्टेंबर 2022
  9. जेईई ॲडव्हान्स्ड रिझल्ट 2022- 11 सितंबर 2022 (टेंटेटिव्ह)

जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा २०२२ दोन शिफ्टमध्ये होणार

आयआयटी मुंबईने दिलेल्या वेळापत्रकानुसार, उमेदवार जेईई ॲडव्हान्स्ड ॲडमिट कार्ड 2022 रिलीज झाल्यानंतर डाउनलोड करू शकतात. त्यांना प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची संधी 28 ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजेपर्यंत मिळणार आहे. आयआयटी जेईईची परीक्षा सकाळ आणि दुपार अशा दोन शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. सकाळच्या शिफ्टच्या परीक्षा सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत, तर दुपारच्या शिफ्टच्या परीक्षा दुपारी 2.30 ते 5.30 या वेळेत होणार आहेत. जेईई ॲडव्हान्स्डचा निकाल 11 सप्टेंबरपर्यंत जाहीर होऊ शकतो, असे मानले जात आहे.

ॲडमिट कार्ड लिंक अधिकृत वेबसाइटवर ॲक्टिव्हेट केली जाणार

ॲडमिट कार्ड जाहीर झाल्यानंतर ते तपासण्यासाठी ॲडमिट कार्ड लिंक अधिकृत वेबसाइटवर ॲक्टिव्हेट केली जाणार आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना काही स्टेप्स फॉलो करून ॲडमिट कार्ड डाऊनलोड करता येणार आहे. प्रवेशपत्राशी संबंधित सर्व प्रकारच्या अपडेट्ससाठी विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट तपासत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

ॲडमिट कार्ड डाउनलोड कसे करावे?

  • ॲडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी jeeadv.ac.in अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • होमपेजवर ॲडमिट कार्डची लिंक दिसेल.
  • लॉगिन क्रेडेन्शियल्सद्वारे लॉगइन करा.
  • आता तुम्हाला तुमचं जेईई ॲडव्हान्स्ड ॲडमिट कार्ड स्क्रीनवर पाहता येणार आहे.
  • ॲडमिट कार्ड तपासून ते डाऊनलोड करून त्याची प्रिंटआऊट घ्या.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.