AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

JEE Main 2022 Paper 2 निकाल जाहीर! JoSAA समुपदेशन कधीपासून? वाचा सविस्तर

जेईई मेन पेपर 2 च्या निकालाची लिंक अधिकृत वेबसाइटवर सक्रिय करण्यात आलीये. निकाल डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला जेईई मेन्स प्रवेशपत्र आणि इतर लॉगिन क्रेडेन्शियल्सची आवश्यकता असणारे.

JEE Main 2022 Paper 2 निकाल जाहीर! JoSAA समुपदेशन कधीपासून? वाचा सविस्तर
JEE main 2022 paper 2 result outImage Credit source: Social Media
| Updated on: Sep 02, 2022 | 10:15 AM
Share

संयुक्त प्रवेश परीक्षा (Joint Entrance Exam) मेन्स 2022 पेपर 2 चा निकाल जाहीर झालाय. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency) हा निकाल जाहीर केलाय. उमेदवार आता त्यांचा जेईई मेन्स निकाल ऑनलाइन डाउनलोड करू शकतात. निकाल डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना jeemain.nta.nic.in अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. जेईई मेन पेपर 2 (JEE Main Paper 2) च्या निकालाची लिंक अधिकृत वेबसाइटवर सक्रिय करण्यात आलीये. निकाल डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला जेईई मेन्स प्रवेशपत्र आणि इतर लॉगिन क्रेडेन्शियल्सची आवश्यकता असणारे.

JoSAA समुपदेशन 2022

जेईई मेन 2022 पेपर 2 चा निकाल जाहीर झाल्यानंतर आता उमेदवारांना JoSAA समुपदेशन 2022 मध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

समुपदेशनानंतर निवड होणाऱ्या उमेदवारांना देशातील सर्व आयआयटी आणि एनआयटीमध्ये विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहे.

त्याचबरोबर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) यांच्यासह देशातील इतर संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संयुक्त जागा वाटप प्राधिकरणाने (JoSAA) समुपदेशन वेळापत्रक जाहीर केले आहे.

वेळापत्रकानुसार JoSAA समुपदेशन 2022 12 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

समुपदेशनासाठी अर्ज कसा करावा?

पेपर 2 चा निकाल जाहीर झाल्यानंतर आता उमेदवारांना समुपदेशनासाठी josaa.nic.in अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.

एकदा यशस्वीरित्या लॉग इन केल्यावर, उमेदवारांना स्वयंचलितपणे JoSAA 2022 च्या डेटाबेसवर रिडायरेक्ट केले जाईल.

उमेदवारांनी नोंदणी पूर्ण करण्यापूर्वी पुन्हा सर्व तपशील तपासावा. वेळापत्रकानुसार, JoSAA 2022 राऊंड वन समुपदेशनासाठी अर्ज प्रक्रिया 21 सप्टेंबर रोजी संपेल. जागा वाटपाचा निकाल 23 सप्टेंबर रोजी जाहीर केला जाईल.

जेईई मेन 2022 पेपर 2 निकाल थेट लिंक

जेईई मेन 2022 पेपर 2 चा निकाल कसा तपासायचा?

  1. निकाल पाहण्यासाठी jeemain.nta.nic.in अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  2. होमपेजवर तुम्हाला जेईई मेन 2022 पेपर 2 स्कोअर कार्ड लिंक दिसेल. या लिंकवर क्लिक करा.
  3. एक नवीन पेज उघडेल, जिथे आपल्याला आपले लॉगिन तपशील भरावे लागतील.
  4. अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख भरावी लागेल
  5. आता तुम्हाला तुमचा जेईई मेन्स पेपर २ चा निकाल आणि रँक पाहता येईल
  6. निकाल डाऊनलोड करा आणि भविष्यातील वापरासाठी त्याची प्रिंटआऊट घ्या.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.