AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

JEE Main Results 2022: जेईई मेन 2022 निकाल कधी? कसा चेक करणार निकाल?

JEE Main Results 2022: नॅशनल टेस्टिंग एजन्सी निकालासह सत्र 1 साठी जेईई मेन 2022 टॉपर्सची यादी देखील जाहीर करणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर प्रत्येक राज्यात पहिल्या क्रमांकावर असलेल्या विद्यार्थ्यांची यादी तसेच 100 टक्के विद्यार्थ्यांची यादी एनटीएकडून (NTA)शेअर केली जाणार आहे.

JEE Main Results 2022: जेईई मेन 2022 निकाल कधी? कसा चेक करणार निकाल?
JEEImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jul 11, 2022 | 8:58 AM
Share

JEE Main Results 2022: जेईई मेन 2022 (JEE Main 2022) चा सत्र 1 चा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी जेईई मेन 2022 सत्र 1 स्कोअर कार्ड अधिकृत वेबसाइट्स, jeemain.nta.nic.in आणि ntaresults.nic.in वर ऑनलाइन जारी करणार आहे. हा निकाल आज किंवा येत्या दोन दिवसात लागण्याचं बोललं जातंय. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अधिक अपडेट्स आणि माहितीसाठी अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. माहितीनुसार, नॅशनल टेस्टिंग एजन्सी निकालासह सत्र 1 साठी जेईई मेन 2022 टॉपर्सची (JEE Toppers) यादी देखील जाहीर करणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर प्रत्येक राज्यात पहिल्या क्रमांकावर असलेल्या विद्यार्थ्यांची यादी तसेच 100 टक्के विद्यार्थ्यांची यादी एनटीएकडून (National Testing Agency)शेअर केली जाणार आहे.

JEE Main निकाल कसा तपासायचा ?

  • निकाल पाहण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जा.
  • वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावरील लेटेस्ट अपडेट जा.
  • यानंतर JEE मुख्य सत्र 1 अंतिम निकाल 2022 च्या लिंकवर जा.
  • पुढील पानावर अर्ज क्रमांक आणि पासवर्ड/जन्मतारीख टाकून लॉग इन करा.
  • तुम्ही लॉग इन करताच, रिझल्ट स्क्रीनवर दिसेल.
  • निकाल तपासल्यानंतर त्याची प्रिंट नक्कीच घ्या.
  • JEE Mains च्या वेबसाइटवर लक्ष ठेवा

रिझल्ट चेक करण्यासाठी डायरेक्ट लिंक इथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळे

  1. jeemain.nta.nic.in
  2. ntaresults.nic.in
  3. nta.ac.in

अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवण्याचा सल्ला

ताज्या अपडेट्ससाठी अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आलाय. JEE मेन 2022 सत्र 2 प्रवेशपत्र 18 जुलै 2022 पर्यंत येणं अपेक्षित आहे. गेल्या वर्षी, जेईई मेन 2022 4 सत्रांमध्ये घेण्यात आली होती. बहुतेक सत्रांसाठी, NTA ने विक्रमी वेळेत निकाल जाहीर केले. तसेच, JEE मुख्य सत्र 2,30 जुलै रोजी संपत आहे आणि निकाल देखील ऑगस्टच्या 7 दिवसात अपेक्षित आहे.

जेईई मेन 2022 चा निकाल जाहीर झाल्यानंतर काय होईल?

जेईई मेन 2022 चा निकाल सत्र 1 साठी जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी एकतर जेईई मेन्स सत्र 2 परीक्षा 2022 ला बसू शकतात किंवा ते जेईई ॲडव्हान्स्ड 2022 साठी अर्ज करण्याची तयारी करू शकतात. नंतरची परीक्षा आयआयटी, एनआयटीच्या प्रवेशासाठीची पात्रता परीक्षा आहे.

Follow Us
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...